Halloween party ideas 2015

महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे गूणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
एस एस सी शालांत परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला सदर परीक्षेत महात्मा फूले हायस्कूल ने घवघवीत यश प्राप्त केले व विद्यालयाचा निकाल १००% लागला सदर परीक्षेत प्रवीण सखाराम बारेला 86.40% प्रथम, राजेश मगन नाईक 84.00% द्वितीय, सागर सखाराम बारेला 81.80% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
या विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय समिती मार्फत करण्यात आला
सदर यशाबद्दल संत सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन ,शालेय समितीचे चेअरमन अरुणकुमार देवराम माळी, नूतन प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र राघो महाजन संचालक रविंद्र शांताराम महाजन , सुदर्शन नामदेवराव महाजन , पी जी चौधरी अॅड.श्री मनोहर मधूकर महाजन व मुख्याध्यापक ए.एन महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी उत्कृष्ट निकाल लागल्या बद्दल. वर्ग शिक्षक .एस पी माळी व सर्व शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.