Halloween party ideas 2015

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मदतीचा हात

अमळनेर तालुक्यातील कोरोनाच्या पेशंटच्या नातेवाईकांना झोपण्यासाठी शिवसेना पदाधिकारी प्रताप शिंपी, व जीवन पवार यांचा मदतीचा हात.

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सध्या अमळनेर तालुक्यात कोणाच्या प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामीण भागातील ही पेशंट अंमळनेर शहरात दवाखान्यात ॲडमिट आहेत बऱ्याच वेळा नातेवाईकांना रात्री झोपण्यासाठी इकडे तिकडे किंवा बसस्थानकावर रात्र काढावी लागते अशावेळी अमळनेर शहराचे शिवसेनेचे माजीशहराध्यक्ष प्रताप शिंपी व उपशहर प्रमुख जीवन पवार यांनी आठ दहा नागरिकांची झोपण्याची व्यवस्था केली आहे तरी गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
अमळनेर तालुक्याचे कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आठ ते दहा वर्षापूर्वी एक मोठा हॉल बांधून दिला होता. आज तो प्रशस्त हॉल त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील कोरोनाच्या पेशंटच्या नातेवाईकांना झोपण्याची व्यवस्था होईल यासाठी उपलब्ध करून दिला आहे. याबाबत प्रभाग 15 चे कार्यक्षम नगरसेवक व शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष प्रताप शिंपी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सध्या ग्रामीण भागातील पेशंटच्या नातेवाईकांना झोपण्याची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही ही व्यवस्था केली आहे आधीच शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे 80 टक्के समाजसेवा 20 टक्के शिवसेना या उक्तीप्रमाणे आम्ही कार्य करीत आहोत.यासाठी आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील पेशंटच्या नातेवाईकांनी तात्काळ सेवा रात्री-बे रात्री दवाखान्यात नातेवाईकांना झोपण्याची व्यवस्था नसली तरी. आम्हाला संपर्क साधणे .साधारण दहा लोकांची व्यवस्था रोज होत जाईल. (जय हिंद निवास) संपर्क कार्यालय (जय हिंद व्यायाम शाळा) शिवाजी नगर शिरुड नाका, अमळनेर संपर्क (प्रताप आबा माजी शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक-9970963631) (जीवन पवार उपशहर प्रमुख शिवसेना-९४२२९७२४७२
यांनी कळविले आहे.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.