*अरुण मोरे यांना राज्यस्तर गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर*
नंदगाव येथिल तंत्रस्नेही व उपक्रमशिल शिक्षक श्री अरुण मोरे यांना राज्यस्तर गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक श्री.अरुण नारायण मोरे यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 5 सप्टेबर रोजी कोल्हापूर येथे हा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यंदा लॉकडाऊन असल्यामुळे ऑनलाईन इ-प्रमाणपत्र देण्यात येऊन नंतर शासकीय परवानगीने कार्यक्रम घेऊन पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रत्यक्ष स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अरुण मोरे यांनी आपल्या सेवा काळात जि.प.शाळा दहिवद खु. येथे शाळा हिरवीगार व विद्यार्थी स्नेही वातावरण निर्मितीसाठी बहुमूल्य योगदान दिले. तसेच जि.प.शाळा, नंदगाव येथेही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीबरोबर आपल्या स्वत:च्या मुलीला कार्यरत शाळेत दाखल करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. तसेच शालेय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले बहुमोल योगदान देत आहेत. अरुण मोरे यांच्या शैक्षणिक योगदानासह जि.प.शाळांबद्दल विश्वास निर्माण करणे, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर व विद्यार्थ्यांप्रती आत्मियतेबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. श्री.अरुण मोरे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.आर.डी.महाजन, शिक्षणविस्ताराधिकारी श्री.पी.डी.धनगर, श्री.बी.पी.चौधरी , केंद्रप्रमुख श्री.गोकूळ पाटील, सानेगुरुजी शै.विचारमंच, मित्रपरिवार, अमळनेर तालुक्यातील विविध संघटना व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.
