राज्यातील खाजगी बससेवा सूरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून प्रवाशांसाठीचे ई पास सेवा देखील बंद केली आहे त्यामूळे ऊद्या दि १ सप्टेंबर पासून खाजगी बसेस धावू शकणार आहेत राज्यातील खाजगी बस सेवा चालक मालक संघटनेने २ सप्टेंबरला राज्यव्यापी आंदेलनाचा ईशारा दिला होता तर जळगांव जिल्हयातील बसचालकांनी सामूहिक आत्महत्येची परवानगी राज्य शासनाकडे करून बससेवा सुरू न केल्यास सर्व बसेस जिल्हा परिवहन कार्यालयात लावण्याचा ईशारा दिला होता राज्यशासनाने यावर तातडीने निर्णय घेतल्याने खाजगी बस वाहातूक संघटनेचे अजय केले रविंद्र चौधरी अमोल पाटील जयंत पाटील मून्ना सोनार यांनी आभार मानले आहे जिल्ह्यात सूमारे ४०० खाजगी प्रवाशी वाहातूक मूंबई पूणे आदी मोठ्या शहरात प्रवाशी वाहतूक करतात त्या ऊद्या पासून रस्त्यावर धावणार आहे गेल्या ६ महिन्यांपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हि सेवा बंद होती अनलॉक ४ मध्येही बससेवा सूरू करणेबाबत कूठलेही दिशा निर्देश नसल्याने लक्झरी मालकांनी आंदोलन तिव्र करून सामूहिक आत्महत्येचा पावित्रा घेतला होता प्रसार माद्यमांनी हा प्रश्न ऊचलून धरल्याने राज्य शासनाला जाग आली त्यामूळेच हा निर्णय झाला म्हणून खाजगी प्रवाशी वाहातूक संघटनेच्या वतिने अजय केले यांनी प्रसार माद्यमांचे आभार मानले आहे
*राज्यातील खाजगी बससेवा उदयापासून सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाचा हिरवा कंदील,२ सप्टेंबर पासून खाजगी बस सेवा चालक संघटनेने राज्यव्यापी संपाचा दिला होता इशारा*
अमळनेर प्रतिनिधी
