वेब मिडीयाचे संघटन होणे गरजेचे
अनिल महाजन
वेब मीडिया असोसिएशन,मुंबई ऑनलाईन बैठक संपन्न.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आज दिनांक २८/०८/२०२० रोजी झुम(zoom) अप्लिकेशन द्वारे ऑनलाईन बैठक संपन्न झाली.
ऑनलाईन बैठकीची सुरुवात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांच्या ओखळ परिचयाने झाली.सदर ऑनलाईन बैठकीला २५ वेब पोर्टलचे संपादक- मालक बैठकीला उपस्थित होते.बैठकीच्या अध्यक्ष स्थानी वेब मिडिया असोसिएशन,मुबंईचे प्रदेश अध्यक्ष श्री.अनिल महाजन हे होते.
बैठकीला वेब मीडिया असोसिएशनचे उपाध्यक्ष इरफान शेख व संचालक सदस्य (०१) अभिजित पाटील(०२) आनंद शर्मा(०३) अयाज मोहसिन(०४) नरेंद्र कसबे(०५) माऊली डांगे(०६) प्रमोद दांडगव्हाण (०७) गणेश पुजारी.
आधुनिक तंत्रज्ञान मध्ये नवीन प्रवाह आला आहे तो म्हणजे वेब मीडिया जलद गतीने इंटरनेट ह्या मदतीने न्यूज प्रसारित केली जात आहे. यासाठी वेब मीडियासाठी केंद्र सरकारने पॉलिसी तयार करावी या साठी प्रस्ताव तयार करून माहिती प्रसारण मंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांचे कडे पाठवण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला.*
वेब मीडिया असोसिएशनची जिल्हा व तालुका निहाय सदस्य नोंदणी व नवीन कार्यकारणी करण्याचे ठरले आहे.
महाराष्ट्रातुन एकूण किमान १०० प्रमुख वेब पोर्टलने ज्यांचे viewers,subscriber मोठ्या प्रमाणात आहेत. अश्या वेब पोर्टलच्या संपादक-मालक यांनी वेब मिडिया असोसिएशनचे सभासद होण्याचे ठरवले आहे. राज्य पातळीवर व जिल्हा पातळीवर निर्भिड पणे चालवले जाणारे हे न्यूज पोर्टल आहे. अश्या लोकांनी वेबमिडिया असोसिएशनचे सभासद होण्या करिता संपर्क साधला आहे.
यावेळी अध्यक्ष अनिल महाजन यांनी बैठकी दरम्यान सांगितले की,जे वेबमिडिया पोर्टल दर्जेदार असतील त्यांनाच असोसिएशनचे सभासद तत्व देणार. ज्या वेब पोर्टल चे viewers,subscriber जास्त असतील त्यांना प्राधान्य देणार असल्याचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले.