द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने....
सामाजिक बांधीलकी जोपासणारा देवमाणूस नानासाहेब कै बी.एन.पाटील
समाजात काही माणसे अशी असतात स्वतः साठी न जगता दुसऱ्याच्या सुख दुख्खात सहभागी असतात असेच अमळनेर तालुक्यातील एक व्यक्तिमत्व व देवमाणूस नानासाहेब कै बी.एन पाटील होय....नानासाहेब यांचा प्रवास, विस्तार अधिकारी ते सहायक गटविकास अधिकारी
असा आहे. नानासाहेब यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एखादा माणूस कितीही संकटात असेल नाना त्यांना धिर देत असत..व संकटाचा सामना करण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करीत असत.नाना मला नेहमीच एक मोठया भावाप्रमाणे धिर देत.सर तुम्ही आईची सेवा करीत आहेत. तुम्हाला परमेश्वर काहीच कमी पडणार नाही असे नाना सांगत.नानासाहेबांची काम करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे.नानासाहेब अचानक सोडून चालले गेले.. म्हणतात ना.परमेश्वराला चांगले माणसं अधिक आवडतात. नानासाहेब नेहमीच आपल्या मुलांचे नेहमीच कौतुक करीत असत..नानासाहेब यांचे दोन्ही मुले राम व लक्ष्मण आहेत. त्यांची पत्नी व आमच्या वहीनीसाहेब यांचा स्वभाव मवाळ व गोड आहे. नानांचा परीवार व गोतावळा मोठा होता.नानासारखेच ते सामाजिक बांधीलकी जोपासत असतात. भविष्यात नानासाहेब यांनी पाहिलेले स्वप्न दोन्ही मुले पुर्ण करतील.
पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनून ती उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनून आनंदाने सर्वांवर बरसते .त्याच प्रमाणे सर्वाना आनंद देणारे व्यक्तिमत्त्व माझे नाना साहेब प्रत्येकाच्या सुख दुःखा मध्ये सामील होणारे ते म्हणतात ना की माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय मानून आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही ते खरंच! जळगाव जिल्ह्यातील सामान्य कुटुंबात जन्मलेले नानांनी स्वतःच्या किर्तीने त्यांचे नाव पुढे आणले कोणत्याही आर्थिक, सामाजिक, राजकीय वारसा नसतांना देखील अत्यंत चिकाटीने, हुशारीने आपले कर्तृत्वाने कमी वेळेत लोकांना साजेसे केले . थोडक्यात सांगायचं झाल्यास साक्री येते पदावर कार्यरत असतांना I.R.D.P योजनेअंतर्गत व दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत आदिवासी विभागात 100℅पेक्षा जास्त धुळे जिल्ह्यातील उल्लेखनीय काम केलं 110 कोटीचे कर्ज सहाशे लाभार्थ्यांना वाटप करून दारिद्र्य निर्मूलन योजनेअंतर्गत अत्यंत प्रभावी पणे काम केले .त्याच प्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांनी आवडीने मोठ्या प्रमाणात काम केले शिक्षण, डिग्री ,पैसा, यावरून माणूस कधीच मोठा होत नसतो फक्त कष्ट ,अनुभव, माणुसकी हीच माणसाची खरी ओळख ठरवते.त्यांच्या कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना जीवनरत्नपुरस्कार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड,नवरत्न पुरस्कार अश्या वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला आहे... नानासाहेब तुमची कारकीर्द जरी कमी असली तरी तुम्ही केलेले काम नेहमी आमच्या स्मरणात राहील.....
नानासाहेब आपल्या दुसऱ्या पुण्यस्मरण निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐
संकलन
ईश्वर आर महाजन
संपादक
मराठी लाईव्ह न्युज
9860352960
9766939950
