अमळनेर तालुक्यातील वीज कंपनीच्या समस्यांबाबत मंत्रालयातील बैठकीत चर्चा.
प्रतिनिधी अमळनेर
गुरुवारी मंत्रालयात राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
बैठकीस अमळनेर मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील, नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, देवळालीच्या आमदार श्रीमती सरोज अहिर व इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता व महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे आदी उपस्थित होते.
यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघातील विजेच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली व अमळनेर शहरासह ग्रामीण भागात नवीन प्रस्तावित सबस्टेशनांच्या कामांना गती देण्याची मागणी केली तसेच यावर्षी पावसाळा चांगला असल्यामुळे वीजेचा भार लक्षात घेता रोहित्र वेळेवर उपलब्ध व्हावेत अशी विनंती केली, अमळनेर शहरातून उच्चदाब (३३ के व्ही.) विद्युत वाहीनी गेली असून बाहेरील भागातून २२० के.व्ही. अमळनेर उपकेंद्रावर स्थलांतरीत करण्यात यावी त्यासाठी २२० के व्ही. अमळनेर उपकेंद्र येथे ३३ के.व्ही. चे फिडर दुभाजक टाकण्यात यावे.
३३/११ के.व्ही. कळमसरे उपकेंद्र येथे एक उच्चदाब रोहित्र ५ एम व्ही.ए ते १० एम व्ही.ए. करण्यात यावा.
तापी व बोरी नदीकाठावरील शेतकऱ्यांसाठी मौजे मारवड येथे नविन ३३/११ के व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात यावे.
३३/११ के.व्ही. अमळगाव उपकेंद्र येथे नविन ५ एम व्ही.ए.उच्चदाब रोहित्र मंजूर करण्यात यावा.
अमळनेर तालुक्यातील ओव्हरलोड झालेल्या शेती पंपाच्या रोहित्राची क्षमतेत वाढ करणे व अतिरीक्त रोहित्र मजूर करणे, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
