राहूल चौधरी आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्ड २०२०-२१ ने सन्मानित.
जळगाव प्रतिनिधी
मायक्रोसॉफ्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि शिक्षक यासाठी कार्य करीत असते . विविध देशातील शिक्षक या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले असतात . मायक्रोसॉफ्टच्या विविध तंत्रज्ञान विषयक कार्य करणार्या शिक्षकांचा गौरव मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर , व मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अशा अवॉर्ड ने सन्मानित करते .अशा या आंतर्राष्ट्रीय स्तरावरील मायक्रोसॉफ्ट च्या सन २०२०-२१ च्या अवॉर्डने श्री राहुल चौधरी जळगाव यांना सन्मानित करण्यात आले .या साठी त्यांना श्री महेंद्र नेमाडे जळगाव व श्री बी बी पाटील कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे . श्री राहुल चौधरी सर जळगाव तंत्रस्नेही टिम च्या माध्यमातून पूर्ण जळगाव जिल्हा तंत्रस्नेही करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आज पर्यन्त त्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव , शिक्षण विभाग जळगाव जिल्हा परिषद, रोटरी क्लब जळगाव , नॉलेज ब्रिज फौंडेशन अहमदनगर , शारिरीकशिक्षण तंत्रस्नेही पॅनल महाराष्ट्र , यांच्या सहकार्याने जळगाव तंत्रस्नेही टिम च्या माध्यमातून जळगाव जिल्हा तंत्रस्नेही करण्यासाठी भरीव असे कार्य केले आहे.व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा , एक्सेल कार्यशाळा , निकाल सॉफ्टवेयर कार्यशाळा ,विविध अॅप विषयी मार्गदर्शन कार्यशाळा , आणि कोरोंना काळातील विशेष बाब म्हणजे ऑनलाइन अध्यापन कसे करावे याविषयी ऑनलाइन अध्यापन वेबिनार ,कंटेंट निर्मिती कार्यशाळा आदि विविध बाबीचे आयोजन केले., आंतरराष्ट्रीय मायक्रोसॉफ्ट एक्सपर्ट अवॉर्ड ने त्याच्या या कार्याची पोच त्यांना मिळाली आहे .
या यशाबद्दल शकुंतला जे प्राथमिक विद्यालय चे अध्यक्ष श्री शरददादा महाजन व श्री दीपकभाऊ सराफ यांनी कौतुक केले आहे. या कार्यासाठी त्यांना प्रेरणा व मार्गदर्शन करणारे सौ मंजूषा क्षीरसागर प्राचार्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव. श्री बी जे पाटील साहेब शिक्षणाधीकारी माध्यमिक , श्री देवीदास महाजन साहेब , श्री बी एस अकलाडे साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक, मा श्री डी एम देवांग साहेब ,श्री सतीश चौधरी साहेब श्रीमती कल्पना चव्हाण म्याड्म श्री अनिल झोपे साहेब प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार , श्री किशोर वायकोळे साहेब , श्री विजय पवार साहेब , श्री रविकिरण बिर्हाडे साहेब , हाजी फिरोज पठाण साहेब सौ रागिणी चव्हाण म्याड्म रोटरी क्लबचे श्री जितेंद्रदादा ढाके श्री डॉ तुषार फिरके ,श्री पी एम जंगले सर, श्री सी डी पाटील सर श्री प्रमोद आठवले सर , खाजगी प्राथमिक मित्र परिवार , व जळगाव तंत्रस्ंनेही शिक्षक टिम या सर्वांनी त्यांच्या या यशाबद्दल कौतुक केले.
