Halloween party ideas 2015

तालुक्यातील चोपडाई चेकपोस्ट वर गैरप्रकार पाहून संतापले आ.अनिल पाटील

स्पॉटवर जाऊन काढली पोलीस कर्मचाऱ्यांची खरडपट्टी,गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
-कोरोना लॉक डाऊनमुळे वाहतुकीस काही निर्बंध असल्याचा फायदा घेत तालुक्यातील चोपडाई येथील जिल्हाच्या सीमेवरील चेकपोस्टवर पोलिसांकडून वाहनधारकांडून गैरप्रकारे पैसे उकळले जात असल्याची आणि याठिकाणी अनेकांची लूट होत असल्याची माहिती आ अनिल पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
विशेष म्हणजे रात्री हा प्रकार आमदारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी काढून चोपडाईच्या दिशेने धाव घेतली मात्र पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत चेकपोस्ट वरील कर्मचाऱ्याना तात्काळ बोलावून आमदारांना जानव्याजवळ गाठले,तेथेच सर्वांसमक्ष आ पाटील यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून लॉकडाऊन च्या नावाखाली माझ्या जनतेची अशी कुणी अडवणूक व लूट करीत असेल तर ती मुळीच सहन केली जाणार नाही अशी तंबी देत पोलीस निरीक्षकाकडेही नाराजी व्यक्त केली आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय डिपार्टमेंटल चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आ अनिल पाटील यांच्याकडे चोपडाई कोंढावळ येथील सीमाबंदी चेकपोस्ट वर पोलिसांकडून लूट होत असल्याची तक्रार अनेक नागरिक व वाहनधारकांनी केली होती ,यानंतर काल रात्री टाकरखेडा येथील एक कुटुंब धुळे येथून अत्यावश्यक काम आटोपून वाहनाने येत असताना चोपडाई येथे त्यांना अडवून बराच वेळ ताटकळत ठेवले आणि एक पंटर मार्फत सोडण्याचे पैसे घेतले संबंधितांनी ही बाब आ अनिल पाटील यांना फोन करून कळवीत तक्रार केली,आमदारांनी त्या पोलिसास मोबाईल देण्याचे सांगितले असता संबंधित पोलिसाने नकार दिला यामुळे आमदारांनी संतप्त होत आपले वाहन काढून चोपडाईचा रस्ता धरला तोपर्यंत पोलीस निरीक्षक मोरेंना ही माहिती मिळाली असल्याने त्यांनीही आमदारांच्या मागे जाऊन त्यांना जानव्याजवळ गाठत समजूत काढली पोलीस कर्मचार्यांना त्याठिकाणी बोलविल्यानंतर आमदारांनी झापझापी केली.

चोपडाई कोंढावळ लुटीचा अड्डा झाल्याचा आमदारांचा आरोप

यासंदर्भात आ अनिल पाटील बोलताना म्हणाले की शासनाने लॉक डाऊन मध्ये थोडी शिथिलता आणल्यानंतर तालुका अंतर्गत प्रवास सुरू झाला आहे,मात्र काही पोलीस कर्मचारी नाकाबंदी च्या नावाने विनाकारण लोकांची अडवणूक करतात,चोपडाई कोंढावळ येथील चेक पोस्ट वर दोन ते तीन तास काही वाहनांना थांबवून ठेवले जाते आणि पंटर मार्फत पैसे घेऊन सोडले जाते,अनेक जण धुळे येथे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेऊन जात असतात विशेष म्हणजे वाहनात संबंधित रुग्ण आणि फाईल सर्व असते परंतु तरीही त्यांना पासेस च्या नावाने विनाकारण अडवून पैसे उकळले जातात,कुणी व्यावसायिक अंडे आणत असेल तर त्यांचे ट्रे उतरऊन ठेवले जातात,कुणाचा किराणा माल अथवा इतर साहित्य असेल तर त्याचीही लूट केली जाते,असे अनेक किस्से याठिकाणी घडत असून एकीकडे अधिक कोरोना लॉक डाऊन मुळे जनता त्रस्त असताना अश्या पद्धतीने पोलिसांनी पिळवणूक करणे अयोग्य आहे,यामुळे याची गंभीर दखल मी घेतली असून वरिष्ठांशी देखील याबाबत बोलून तक्रार केली आहे,यामुळे याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आपण केली असल्याचे आ अनिल पाटील यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.