महात्मा फुले हायस्कूलला दिले मास्क व असैनिक गोळ्या
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलला विद्यार्थ्यांसाठी नांद्री येथील माजी सरपंच मधुकर चौधरी त्यांनी शैक्षणिक बांधिलकी दाखवत सामाजिक कार्याचा एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
"नाही म्हणावयाला आता आहे करू या...
प्राणात चंद्र ठेवू,हाती उन्हे धरू या!"
या आशयधन पंक्तीप्रमाणे मधुकर चौधरींनी महात्मा फुले हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना शंभर फेस मास्क,आणि शंभर डब्या आर्सैनिक अल्बच्या गोळ्या मोफत दिल्या.
आमच्या शाळेतील जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांच्या प्रयत्नातून मास्क व आर्सेनिक गोळ्या मिळाल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी त्यांचे व माजी सरपंच चौधरी यांचे मनापासून आभार व्यक्त केले.यावेळी शाळेचे शिक्षक उपस्थित होते.