कृषीमंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा 27 ते 30 जुलै दरम्यान 700 टन युरिया प्राप्त होणार, आमदार अनिल पाटील यांनी घेतली कृषी अधिकाऱ्यांची बैठक.
प्रतिनिधी-अमळनेर.
शनिवारी सायंकाळी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली, यावेळी आमदार अनिल पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी भरत वारे व पंचायत समिती कृषी अधिकारी अमोल भदाणे यांच्याकडे युरियाच्या पुरवठा व उपलब्ध साठा या बाबतीत आढावा घेतला.
या आढावा बैठकीत कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवर चर्चा केली, त्यावर त्यांनी तातडीने दखल घेऊन अमळनेर तालुक्यासाठी 700 टन युरिया तालुक्यासाठी 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान प्राप्त होणार आहे.
सध्या युरिया टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे यात शेतकऱ्यांची हंगाम असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात असून सध्या युरियाची टंचाई सुरू आहे, याला कारखान्यांमध्ये हमाली काम करणारे इतर राज्यातील कामगार कोरोनामुळे मुळगावी परतले होते. त्यामुळे युरिया प्राप्तीसाठी विलंब झाला आता हळूहळू युरियाची स्थिती पूर्वपदावर येत असून 27 जुलै रोजी आर.सी.एफ चा 400 टन युरिया प्राप्त होणार आहे तर 30 जुलै रोजी 200 टन नर्मदा व 100 टन इफफो आणि सम्राट या कंपन्यांकडून युरिया प्राप्त होणार आहे.
तरी शेतकऱ्यांना पुरेपूर युरिया उपलब्ध होईल व 30 जुलै पर्यंत युरिया देण्याचे आश्वासन कृषीमंत्री दादा भुसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिले आहे.
