Halloween party ideas 2015


अमळनेरचे
एन.ए.साळुंखे प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील नूतन मराठा संस्था हातेड ता.चोपडा येथे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले.
एन.ए.साळुंखे यांनी आपल्या सेवेत असतांना अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून विदयार्थ्यांनच्या व्यक्तिमत्वाला वाव दिला. क्रिडा शिक्षक असल्याने राष्ट्रीय दिवसानिमित्त अनेक सामाजिक, शैक्षणिक, कार्यक्रम ठेवून गावातील पालकांनी कौतुकाची पाठीवर थाप ठेवली.उत्कृष्ट कामामुळे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक कामाची दखल घेत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
साळुंखे यांनी वावडे,शेवगे,कासोदा, हातेड येथे सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली.ते खेडगांव ता.चाळीसगांव येथील असून ते अमळनेरला स्थायिक आहेत.
त्याचा सेवानिवृत्ती निमित्ताने नुकताच साईमत परीवाराच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करून भावीवाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो
नुतन मराठा संस्थेत हातेड ता.चोपडा येथे सेवानिवृत्त उपक्रमशिल शिक्षक एन.ए.साळुंखे यांचा सहपत्निक शाल व श्रीफळ देऊन सत्कार करतांना दैनिक साईमतचे अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर महाजन व परीवार

फोटो

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.