Halloween party ideas 2015


ईद निमित्त व.ता.आबा –डी.डी.नानांकडून
गोरगरीबांना ११ हजाराची रोख मदत
अमळनेर, प्रतिनिधी– कोरोनामुळे आर्थिक मंदीचे चटके सोसत असणाऱ्या खऱ्या गोरगरीबांना ईद निमित्त मदत करण्यासाठी दैनिक पुण्य प्रताप चे संपादक व.ता. आबा पाटील व कार्यकारी संपादक डी.डी नाना पाटील यांनी त्यांच्याकडून ११ हजार रुपये रोख स्वरूपात अमळनेर वकील संघ अध्यक्ष एड. शकील काझी यांना आज सायंकाळी दिले.
ऍड. शकील काझी हे येथील जडीबुटीवाले सय्यद आरिफ व रफियोद्दीन( रफा दादा, चुनाभट्टी) ह्या कार्यकर्त्यांच्या मार्फत गरजूंना लागलीच वाटून देणार आहेत.
यावेळी पत्रकार पांडुरंग पाटील तसेच पप्पू पाटील आर्डीकर हेदेखील उपस्थित होते.
व. ता. आबा व डी.डी. नाना यांनी याआधीसुद्धा कोरोनात अडचणीत आलेल्यांना मदत केली आहे.
पत्रकार व. ता. आबा पाटील यांनी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ता ऍड. शकील काझी यांना बोलावित गोरगरिबांचापर्यंत तुमच्या पद्धतीने ही आर्थिक मदत पोहोचविण्याचे सांगितले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.