पन्नास गरीब कुटुंबाना दिला प्रत्येकी एक महिन्याचा किराणा
कळमसरे ता.अमळनेर---
सद्स्यस्थितित सर्वत्र कोरोना आजारामुळे बेरोजगारी ,भूखबळी वाढल्याने गोरगरीबांचे हाल होत आहेत.तर कामधंधा नसल्याने घरातील अन्न धान्यही संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे.यातच बरेच दात्यानी मदतीचा हात पुढे केला आहे. सानेगुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनीही यावेळी मानुसकीचा हात पुढे करीत अमळनेर शहरातील गरजु कुटुंबाना एका महिन्याचा किराणा वाटप केला.यात गव्हाचे पीठ,तांदूळ ,तेल,साखर,साबण, खोबरेल तेल,
तुरदाल,मिरची ,हळद ,मसाला, मीठ ,माचिस, हात रुमाल,मास्क आदी वस्तुंचा यात समावेश होता. याप्रसंगी सानेगुरुजी विद्यालयाचे इयत्ता दहावीचे माजी विद्यार्थी यांनी जवळपास शेचाळीस हजाराचा किराणा गरजुना वाटप केला. वाटप प्रसंगी अॅड. यदनेश्वर पाटील, प्रा.विजय बेहरे,बालरोग तज्ञ डॉ.विनोद पाटील, अनिल महाजन, सुनील महाजन,यशश्री बागुल आदीनी गरजुना घरपोच किराणा वाटप केला.यावेळी महिन्याभराचा किराणा पन्नास कुटुंबाना मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.तर काहींचे डोळेही पाणावले होते.सानेगुरुजी विद्यालयाचे माजी विद्यार्थ्याच्या या दातृवाने सर्वत्र कौतुक होत आहे.
