अमळनेर येथिल पिंपळे रोड परिसरातील रहिवासी लहानगी कु.चार्वी यतीन पवार हिने स्वतःच्या गल्यात जमवलेले ५ हजार ५०० रुपये कोरोना साथीत गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानासाठी श्रीमती भानूबेन गोशाळेला देत आपला वाढदिवस साजरा केला.
कु.चार्वी पवार हि शहरात गोरगरिबांना सुरू असलेल्या अन्नदानाच्या कार्याबद्दल आजोबा प्रा.अशोक पवार यांचाकडून रोज ऐकत होती.या परिस्थितीत आज तिने स्वतःचा वाढदिवस हा आपल्या गल्यातील जमवलेल्या रकमेतून गरिबांच्या अन्नदानासाठी श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेस पाच हजार पाचशे रुपये मदत देत साजरा केला आणि बालवयातच तिच्या ठायी असलेल्या संवेदनशील मनाचा परिचय या दातृत्वातून करून दिला.
यावेळी वडील यतीन पवार,गोशाळेचे संचालक चेतन शहा,आजोबा प्रा अशोक पवार ,संदिप घोरपडे व सहकारी कार्यकर्ते यांनी चार्वी च्या दातृत्वाचे कौतुक करून तिला आशीर्वाद दिलेत.तर आ.अनिल पाटिल यांनीही तिच्या या सामाजिक दातृत्वाचे कौतुक केले आहे.

