श्रीरामपुर_कोरोना covid-19 या महाभयंकर संकटाने धावते जग आज स्थिर आहे.परंतु आज विद्यार्थी वर्गापासून ते सर्वानपर्यंत आज घरात सुरक्षित लॉकडाऊन असताना अशा या सुरक्षित परिस्थितीत सर्वांच्या विचारांना चालना मिळावी इतरांना त्याचा उपयोग व्हावा त्याचबरोबर कोरोना नंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे अवलोकन होण्यासाठी या स्तुत्य उपक्रमाच्या पाठीमागचा मुख्य मानस आहे.अशा या परिस्थितीत अनेक महिलांना, पुरुषांना व विद्यार्थी वर्गांना तसेच ज्येष्ठांना आपले विचार मांडण्यासाठी हे एक आपल्यासाठी व्यासपीठ म्हणून भुमी फाऊंडेशन आणि तेजोमय ग्रुप घेऊन येत आहे विचार वेल स्पर्धा तरी सर्व सहभाग नोंदणी करू ईच्छीत असणाऱ्या सर्व
सदस्यांना आव्हान करण्यात येत आहे की आपण आपले लेखमाला आम्हाला दिनांक 24 मे 2020 ते 30 मे 2020 यादरम्यान सदर 9860371464,/9860782844या दिलेल्या संपर्कावर व्हाट्सअप करून पाठवावे. तरी आपले निवडक लेखमाला ह्या आगामी कार्यक्रमात प्रमाणपत्रासह गौरवण्यात येईल तरी या लॉकडाऊनच्या कालखंडात सुट्टीचा सदुपयोग म्हणून आपण सर्वांनी सहभाग मोठ्या संख्येने नोंदवावा असे आव्हान भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.कैलास पवार व तेजोमय मंच च्या प्रा.अश्विनी परदेशी - कोल्हे यांनी केले आहे.
