Halloween party ideas 2015


*आदिवासी वाल्मिकलव्य सेनाच्या वतीने देवपुर परिसरातील गरजूंना किराना सामानचे वाटप



शिंदखेडा प्रतिनिधी (रविंद्र शिरसाठ:-)

धुळे शहरात सध्या करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहर लॉक डाऊन झाल्याने शहरातील हजारो परिवार* *उध्वस्त झाले आहे.व अनेकांची उपासमार सुरू झाली आहे.तसेच धुळे शहरात संचारबंदी व लॉक डाऊन घोषीत झाल्या* *दिवसांपासून "आदिवासी वाल्मिकलव्य सेना" आणी धुळे शहर अॅन्टी करोना टास्क फोर्स धुळे जिल्हा* *तर्फे मोलमजूरी करणाऱ्या परिवारांना प्रत्येकी एक हजार रूपयांचा किराना सामानाचे अविरत वितरण संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूच आहे.तसेच* *आज दि.२४ मे रोजी देखील पाच गरजू परिवारांना अॅन्टी करोना टास्क फोर्सच्या धुळे जिल्हा समन्वयक तसेच आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा सौ.कविताताई कोळी तसेच टास्क* *फोर्सच्या धुळे जिल्हा सल्लागार सौ.मिनाक्षीताई सोनार यांच्या हस्ते किराना सामानचे वितरण करण्यात आले.यावेळी धुळे शहरातील शनीमंदीर गोंदूर रोड* *परिसरातील विधवा,परितक्ता,वृध्द दापंत्य,अपंग व विवीध मोलमजूरी करणाऱ्या पाच परिवारांना किराना सामान घरपोच देण्यात आले.याप्रसंगी अॅन्टी करोना टास्क फोर्सचे धुळे जिल्हा सह* *समन्वयक जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता श्री.कपील सोनार,तसेच सामाजिक कार्यकर्ता* *धनंजय गाळणकर याप्रसंगी उपस्थित होते.तसेच करोना विषाणूच्या पार्श्वभुमिवर असलेली संचारबंदी व लॉक डाऊन संपेपर्यंत* *अॅन्टी करोना टास्क फोर्सच्या वतिने गरजूंना सर्व तऱ्हेची मदत घरपोच तसेच ऑन दी स्पॉट मदत पोहचवली जाईल.असे आदिवासी वाल्मिकलव्य सेनाच्या* *प्रदेशाध्यक्षा सौ.कविताताई कोळी* *यांनी प्रसार माध्यमांना माहीती दिली.*

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.