अमळनेर-वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 480 वी जयंती अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंच च्या वतीने लॉक डाऊन आदेशाचे पालन करत साध्यापद्धतीने महाराणा प्रताप चौकातील राणाजींच्या स्मारकास माल्यार्पण करून साजरी करण्यात आली.
यावेळी राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, अनिल पाटील , अजयसिंग पाटील, विलास पाटील,गुलाबसिंग पाटील, चेतन राजपूत,प्रवीण पाटील तसेच प्रा.किरण पाटील,जयेश पाटील,भटेश्वर वाणी,सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.दरवर्षी राजपूत एकता मंचतर्फे अतिशय थाटात मिरवणूक तसेच विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन राणाप्रतापांची जयंती साजरी केली जात असते,परंतु यंदा कोरोना लॉकडाऊन मुळे सर्वच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध आले असल्याने शासन आदेशाचा सन्मान राखत सर्व मोठे कार्यक्रम राजपूत एकता मंचने रद्द केले.व ग्रामीण आणि शहरी भागातील समाजबांधवांना आपापल्या घरीच राणा प्रतापांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे आवाहन करून शहरातील महाराणा प्रताप चौकातील स्मारकावर केवळ पंच मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्मारकावरील प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करण्यात आले.
