Halloween party ideas 2015


माळी समाजातील जेष्ठ नागरिक राजाराम महाजन यांचे वृद्धपकाळाने निधन

आज कळमसरे येथून राहत्या घरुन निघणार अंत्ययात्रा

अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे येथील माळी समाजातील जेष्ठ नागरिक राजाराम दौलत महाजन वय(८१) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
माळी समाजातील एक जेष्ठ नेते होते.त्यांनी समाजातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते.कळमसरे परीसरात सर्व समाजातील नागरिक त्यांना आण्णा या टोपननावाने परीचीत होते. परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून त्यांनी आपला मोठा मूलगा वासूदेव महाजन
अमरावती जिल्ह्यात एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीत लावले तर लहाण मूलगा गजानन महाजन एक आदर्श शेतकरी आहे.दोन मूली अत्यंत सधन शेतकरी कुटुंबात आहेत. दोन्ही मुले,पत्नी, सुना यांनी त्यांची खुप सेवा केली.राजाराम महाजन हे दिव्यांग होते परंतु जे काम करायचे आहे ते केल्याशिवाय शांत बसत नव्हते. त्याच्या जाण्याने माळी समाजावर मोठे संकट कोसळले आहे.
श्री राजाराम दौलत पाटील यांचे आज दिनांक 26/05/2020 मंगळवार रोजी पहाटे 5:15 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी12:30 वाजता आहे..त्यांच्या मागे पत्नी, दोन मूले सुना,नातवंडे, दोन मुली,जवाई,नातवंडे असा मोठा परीवार आहे. ते प्रा.वासुदेव महाजन व गजानन महाजन यांचे वडील होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.