अमळनेर प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान देणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी , सफाई कर्मचारी आणि कार्यालयीन अशा 555 कर्मचाऱ्यांची नगरपालिकेतर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली व नगरपरिषदेने प्रत्येकाला सुरक्षेसाठी सॅनिटायझर वाटप केले
शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानी सर्वेक्षण , ब्रेकेट्स लावणे , कारवाई करणे , लिलावचे व्यवस्था करणे , सफाई करणे , फवारणी करणे , धोकेदायक कंटेन्मेंट झोन मध्ये सेवा देणे आदी कामे केल्याने त्यांची सुरक्षा धोक्यात आली होती म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य अबाधित रहावे म्हणून त्यांची स्क्रीनिग करून इतर ही आरोग्याची तपासणी करण्याचे आदेश मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांना दिले त्यानुसार डॉ संदीप जोशी , डॉ अविनाश जोशी ,डॉ निखिल बहुगुणे , डॉ नितीन पाटील , डॉ प्रशांत शिंदे , डॉ विलास महाजन , डॉ राजेंद्र शेलकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यानी 555 नगरपालीका कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन व उपचारही करण्यात आलेत नगरपालिकेत ही तपासणी करण्यात आली प्रत्येकाला सॅनिटायझर वाटप केले यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील , मुखायधिकारी डॉ विद्या गायकवाड , संजय चौधरी , आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण , संतोष बिऱ्हाडे , सोमचंद संदनशिव , महेश जोशी , प्रसाद शर्मा यांचे सहकार्य लाभले