नागरिक त्रस्त, कर्मचारी सुस्त
नागरिकांच्या तक्रारीना कर्मचाऱ्यांची केराची टोपली.
नंदुरबार- (प्रतिनिधी)- दि-२२में
नंदुरबार येथील तळोदा रोडवरील जयहिंद कॉलनी येथे असलेल्या डीपीचा एक फ्यूज दर दोन ते तीन दिवसात रात्री अपरात्री बंद पडत असतो यामुळे या परिसरातील काही नागरीकांच्या घरातील विज बंद पड़ते नागरिकांना होत असलेल्या या त्रासाबद्दल येथील नागरीकाकड़ून बऱ्याचदा विज वितरण विभागाच्या कार्यालयात भेट देऊन तोंडी तक्रार केल्या नंतर विज वितरण विभागाकडून कुठलीही दखल घेतली गेली जात नाही त्यानंतर गिरिविहार गेट जवळ असलेल्या विज वितरण विभागाच्या कार्यालयात जाऊन एप्रिल महिन्यात लेखी तक्रार नोंदवून ही अध्यापही कुठलीही दखल घेतलेली नाही . विज वितरण विभागाच्या कार्यालयात तक्रार देताना किवा रात्री ज्यावेळेस विज बंद होते तेव्हा दूरध्वनीवरून तक्रार नोंदवताना विज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याकडून नागरिकांना अतिशय चूकीची वागणूक दिली जातेय व खोट बोलले जाते की आता आम्ही वायरमन पाठवले होते ते फ्यूज दुरुस्त करून गेले तसेच उड़वा-उडवीची ही उत्तरे विज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्याकड़ूंन दिली जात आहे.विज वितरण विभागाच्या अश्या वागणूकीमुळे नागरिकामध्ये संतप्ताची वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरातील फ्यूज दुरुस्त करण्यासाठी कुणीही वायरमैन किवा विज वितरण कर्मचारी येत नसते व या परिसरातील नागरिक हे स्वताचे जीव धोक्यात टाकून या डीपीतील फ्यूज तार स्वताच टाकत आहेत.एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करीत असतांना विज वितरण कंपनीच्या काही हलगर्जीपणामुळे नागरिक आपला जीव मुठीत घालून व विजेच्या बिलाचा भरणा करून असुविधामुळे त्रस्त आहेत. मात्र नागरिकांच्या समस्या सुटतील का? अधिकारी वर्गाने लक्ष घालण्याची गरज आहे नाहीतर स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. आधीच कोरोनाचे भूत मनगटावर असतांना व लाँकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरीच असून विज वितरणाच्या असुविधामुळे वैतागले आहेत.
