Halloween party ideas 2015


तरुणांनो निर्माण होणाऱ्या संधीचं सोनं करा =- कैलास पवार

वाघोली _ आजची सत्य वस्तुस्थिती पाहता तसे संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या विलख्यात अडकले आहे.अशा कठीण परिस्थितीत संपूर्ण जग जीवन हे पूर्णतः विस्कळीत झालेले असून अनेक गोरगरीब मजुरांवर आज उपासमारीची वेळ आहे.अशी परिस्थितीत असताना देशात ठिक ठिकाणी ग्रीन झोन मधील उद्योग समूह पुढे सुरू होण्याचे संकेत आहे.आता सर्वच उद्योगक्षेत्रात इथून पुढे नव्याने मोठ्या प्रमाणात श्रमिक वर्गांची गरज भासणार आहे अशा असंख्य रिक्त जागा भविष्यात प्रत्येक कंपनीत भरल्या जाऊ शकतात या निर्माण होणाऱ्या सुवर्णसंधीचा आज प्रत्येक तरुणांनी आपल्या स्वतःच्या मानसिकतेचा बदल स्विकारुन घर तिथे मनपसंत नोकरी हा हटटास धरण्यापेक्षा संधी जिथे ,तीथे मी याला प्रथम प्राधान्य देऊन प्रत्येक तरूणांनी उदयाच्या निर्माण होणाऱ्या संधीचा जिवनात उपयोग करावा असे आव्हान तरुणांना भुमी फाऊंडेशनचे कैलास पवार यांनी केले आहे.
पुढेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे की गेल्या फेब्रुवारीपासून देशात सर्वच उदयोग समूह आज स्थिर आहे. यामध्ये प्रत्येक उद्योग समूहाचा विकास होण्यात ज्या प्रमाणात मालक वर्ग महत्वाचा आहे त्याच पटित श्रमिक वर्ग देखिल तितकाच महत्वाचा आहे.त्यामुळे मालकवर्ग आणी श्रमिक वर्ग दोन्ही समाधानाने समतोल असनं गरजेचं आहे.परंतु आज तरुण वर्ग हा शिक्षण घेऊन बाहेर पडताना मोठया अपेक्षाच्या सागरात वावरत असतो आणी पुढे जाता अनेक वेळी काही मुलांच्या अपेक्षांचा भंग होऊन हाती निराशा राहते. त्यामुळे असे न करता प्रत्येक तरुणांनी आज त्यांच्या अनुभवाला व मिळणाऱ्या संधीला सर्व प्रथम प्राधान्य देऊन त्यातच पुढे उत्तरोत्तर प्रगती करावी अशी खंत पवार यांनी यावेळी व्यक्त करून स्थानिक युवकांनाच त्यापुढे मोठ्या प्रमाणात संधी मिळावी असेही त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.