Halloween party ideas 2015

आपल्या देशाच्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी ज्यांचा उल्लेख आद्य समाजसुधारक म्हणून केला जातो ... राजा राम मोहन रॉय यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! सनातनी वृत्तीच्या धर्ममार्तंडांनी बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी समाजात अमानुष दृष्ट अश्या अनेक प्रथा प्रचलित केलेल्या होत्या त्यातीलच सती ही अमानुष प्रथा ! ... पतीवरील प्रेम प्रकट करण्यासाठी पतीच्या धगधगत्या चितेवर तिने उडी घ्यावी आणि स्वतःला संपवावं... तिचा जीवन जगण्याचा अधिकारच कर्मठ समाज हिरावून घेत होता नव्हे तिची हत्या करीत होता... आगीत होरपळून घेणाऱ्या त्या स्त्रीच्या किंकाळ्या आपल्या कानावर पडू नयेत म्हणून पाषाणहृदयी माणसं ढोल बजावीत असत.. मुळात विवाह संसार काय असतो हे कळण्याच्या आतच त्या छोट्याश्या मुलीवर विवाहाचं ओझ लादल जात असे या अमानुष प्रथा कायद्याने मोडून काढण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा केला त्यामुळेच ब्रिटिशांनी या प्रथा कायद्याने बंद केल्या परंपरागत रूढी परंपरांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचे महत्व त्यांनी लक्षात घेतले इंग्रजी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असा उल्लेख करणाऱ्या रॉय यांनी कंपनी सरकारला त्याकाळात दरवर्षी इंग्रजी शिक्षणावर एक लाख रुपये खर्च करण्याची मागणी केली नव्हे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात त्यांच्याच पुढाकाराने झाली त्यातूनच नवतरुण वर्गाला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ही तत्त्वप्रणाली उमगली आणि स्वातंत्र्य लढ्या च बीजारोपण त्यातून झाले !!!🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
डॉ.रावसाहेब नेरकर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.