Halloween party ideas 2015


टि २० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज

अगदी कमी कालावधीत टि-२० क्रिकेटने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले आहेत. जेमतेम १५ वर्षांचं आयुष्य असलेलं क्रिकेटचं हे तिसरं अपत्य चांगलंच पोसलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे या सामन्यांचा लागणारा झटपट निर्णय व प्रेक्षकांना बघायला मिळणारी फलंदाजांची घणाघाती फलंदाजी.
टि-२० क्रिकेटने जगाला अनेक धडाकेबाज फलंदाज दिले असून त्यांनीही आपल्या धुवाँधार फलंदाजीने प्रेक्षकांच्या नेत्राचे पारणेच फेडले नाही तर शब्दशः त्यांचे पैसेही वसुल करुन दिले आहेत. टि-२० मध्येही फलंदाजीत अनेक विश्वविक्रम रचले गेले असून त्यात भारतीय खेळाडूही अग्रेसर आहेत.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे ३० एप्रिल १९८७ रोजी जन्मलेला रोहीत शर्मा टि २० च्या सर्व प्रकारच्या खेळात मग ते आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो आपल्या बॅटच्या कर्तबगारीच्या जोरावर जगभरातल्या एकापेक्षा एक वरचढ खेळाडूंपेक्षा काकणभर सरसच आहे.
रोहीत भारताचा तिनही प्रारूपांमधील नियमित सलामीवीर असून सफेद चेंडूच्या खेळात भारताचा विद्यमान उपकर्णधार आहे. निव्वळ टि-२० चाच विचार करायचा ठरला तर या प्रकारात सर्वाधिक धावा करणारा तो भारताकडून दोन नंबरवर असला तरी एक नंबरवर असलेल्या विराट कोहलीपेक्षा फक्त १६१ धावांनी पिछाडीवर असून विराटला मागे टाकण्याचे सर्व हत्यारं त्याच्या भात्यात आहेत.
सन २००७ ला दक्षिण आफिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टि -२० विश्वचषक स्पर्धेत १९ सप्टेंबर २००७ रोजी इंग्लंड विरुद्ध आपल्या पदार्पणाचा सामना खेळला. त्यानंतर आजपर्यंत १०४ टि-२० सामन्यात ३२.१o च्या सरासरीने २६३३ धावा त्याने फटकविल्या आहेत.
टि-२० आंतरराष्ट्रीय सामान्यात सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रमही रोहीतच्याच नावावर असून त्याने ४ शतके ठोकली आहेत. याच बरोबर २२ अर्धशतकेही त्याच्या नावावर आहे. यातही विशेष आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल १० वेळा त्याने ७५ पेक्षा जास्त धावांच्या खेळ्या केल्या असून हा सुध्दा एक विश्वविक्रमच आहे.
रोहीत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३२ कसोटया खेळला असून त्यामध्ये ४६.५४ च्या सरासरीने २१४१ धावा फटविल्या आहेत. त्यामध्ये ५ शतकांचा व १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
 तर २२४ एकदिवसीय सामने खेळून ४९.२७ च्या सरासरीने २९ शतकं व ४३ अर्धशतकं त्याच्या बॅटमधून निघाले आहेत. त्यात विश्वविक्रमी ३ द्विशतकेही सामील आहेत. वनडेत ९११५ इतक्या धावा त्याच्या खात्यात आहेत.
                आयपीएलच्या इतिहासातला तो सर्वाधिक यशस्वी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा करंडक आपल्या नावे केला आहे. तर आयपीएलच्या इतिहासातला तो एकमेव खेळाडू आहे की, सर्वाधिक पाच वेळा विजेत्या संघाचा सदस्य होता. सन २००९ ला डेक्कन चार्जर्स हैद्राबादचा सदस्य व सन २०१३, १५, १७ व २०१९ ला मुंबई इंडियन्स संघाचा तर तो कप्तान होता.
   लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.