मा.प्रमोदजी ब-हाटे
एकच ध्यास, एकच ध्येय, मदत करण्याचा ध्यास.!! गरज असेल तिथे धावून जाण्याचा ध्यास.. लोकांचे भले करण्याचा, मग अशा प्रसंगी खिशाला चाट ,वेळेची कमतरता , बरेवाईट प्रसंग ,अनुकूल-प्रतिकूल प्रसंग व इत्यादी आपसूक आलेत! हे माहीत असतं की ,ज्याच्यासाठी ही सर्व धावपळ करावी त्यांना, त्याचे काहीही सोयरसुतक नसतं तरी देखील कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न करता केलेले खरे समाजकार्य ,एखाद्या व्रतस्थ सामाजिक बांधिलकी मानणारया व्यक्तीकडून होत असते, अशी व्यक्ती म्हणजे आमचे पत्रकार क्षेत्रातील मार्गदर्शक व दैनिक साईमतचे संपादक भाऊसौ प्रमोदजी ब-हाटे ..
कदम ऐसा चलो की, निशान बन जाये!
काम ऐसा करो की ,पहचान बन जाये!
यहा जिंदगी तो सभी जी लेते है!
मगर जिंदगी जियो तो ऐसी!
की सबके लिए मिसाल बन जाये!
मैत्री टिकविणारे आमचे भाऊ....
मैत्रीत त्यांनी कधीही बेगडीपणा किंवा दिखाऊपणा साध्य केला नाही. जे काही बोलायचे किंवा करायचे ते अगदी उस्फुर्त केले .परिणामाची कधीही चिंता केली नाही. बोलायचे ते उत्स्फूर्तपणे रोखठोक.. कुणालाही न दुखविता प्रत्येकाला भाऊंनी मित्र केला. मित्रांचा सागर केला.. त्यांच्या मैत्रीच्या वर्तुळात कोण कोण नाही? श्रीमंतांनपासून अगदी गरिबानपर्यंत, लोकप्रतिनिधीेपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत भाऊंची मित्र आहेत त्यांनी केवळ मैत्री न ठेवता ती जिवापाड जपत आलेले आहेत...
मी दैनिक साईमत तालुका प्रतिनिधीची जबाबदारी भाऊंनी दिल्यानंतर मला नेहमीच सहकार्य व पत्रकारिता करतांना नेहमीच सहकार्य मिळाले आहे.. मला साईमतच्या संपादकीय विभाग नेहमीच सहकार्य करतो..सुख असो दुख्ख असो भाऊ नेहमीच विचारपूस करतात हा त्यांचा मोठेपणा आहे. एखाद्या वृत्तपत्राचा संपादक सगळ्या तालुका प्रतिनिधी व ग्रामीण पत्रकारांशी मित्रत्वाचे संबंध ठेवतो मला दैनिक साईमत मधून दिसले कधीही भाऊंच्या पत्रकारिता अंगात आली नाही भाऊ संपादक असले तरी कधीही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही सर्व पत्रकार तालुका प्रतिनिधी संपादकीय विभाग यांच्याशी भाऊंशी मैत्रीचे संबंध आहेत तेवढेच सत्य...
आज दैनिक साईमत या वृत्तपत्राने अल्पावधीतच वाचकांच्या मनाचा ताईत झाला आहे... साईमतने आजपर्यंत नेत्रदीपक प्रगती केली आहे..भाऊच्या चांगल्या राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संबधामुळे शक्य झाले आहे.
भाऊ म्हणजे एका शब्दात सांगायचे म्हटले तर वावगे होणार नाही.. मैत्रीच्या पलीकडे नातेसंबंध जोपासणारा देवमाणूस..
आज भाऊंचा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्ताने भाऊंसाठी दोन शब्द....
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
शुभेच्छुक
ईश्वर आर महाजन
तालुका प्रतिनिधी
दैनिक साईमत अमळनेर
9860352960
