निफाङ/.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सध्या देशात व राज्यात लॉक डाऊन आहे. त्यानुषंगाने संपूर्ण राज्यात 144 कलम लागू असल्याने आंतरजिल्हा संचारबंदी आहे. त्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पाठारे व तहसीलदार श्री दिपक पाटील यांनी पोलिसदलाच्या मदतीने जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारले आहे. नाशिक जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना इतर बंदोबस्त जास्त असल्याने चेकपोस्ट साठी पोलीस कर्मचारी संख्या कमी आहे. या पोलीसांच्या मदतीला निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे. जिल्ह्याच्या सीमांवर चेकपोस्ट उभारून त्यावर प्राथमिक शिक्षक घड्याळी आठ तास पोलीसांबरोबर काम करत आहेत. निफाड व कोपरगाव तालुक्यांची सरहद्द म्हणजे नाशिक व अहमदनगर जिल्ह्याची सरहद्द आहे. अशा सातमोऱ्या चेकपोस्ट वर सकाळी 8 ते दुपारी 4 , दुपारी 4 ते रात्री 12, रात्री 12 ते सकाळील 8 या प्रमाणे घड्याळी आठ तास प्राथमिक शिक्षक आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा परिषद शाळा गोदानगरचे *मुख्याध्यापक श्री नवनाथ सुडके,* मुख्याध्यापक श्री.माणिक पाटील, शिक्षक श्री शैलेंद्र वाघमारे, श्री दुसाने, निलेश येवले, राजेश सांगळे, संजय वाघ, रामदास बिडगर, बाजीराव कमानकर, प्रमोद पाटील आदी बहुसंख्य प्राथमिक शिक्षक कर्तव्य बजावत आहेत.
सदरच्या चेक पोस्टवर आलेल्या वाहनांची पाहणी करून चालकाचे नाव, मोबाईल नंबर, वाहन कोठून आले, कोठे जाणार ,वाहनाचा नंबर आदी अचूक नोंदी ठेवण्याबरोबरच शोशल डिस्टनसिंग पाळणे, वेळोवेळी हात धुणे,मास्क वापराबाबत ही वाहनचालकांना व प्रवाशांना मार्गदर्शनाचे काम हे सर्व प्राथमिक शिक्षक करत आहेत.
सदरच्या 8 तासाच्या कामाचा अहवाल ड्युटी संपताच पथकप्रमुख श्री जायभाये यांच्याकडे व्हाट्सअप्प द्वारे लागलीच देतात. *कोरोना विषाणूचे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन करतांना आम्ही सर्व प्राथमिक शिक्षक राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत असून या संकटांतून आपला देश लवकरच बाहेर येण्यासाठी खारीचा वाटा उचलत असल्याचे मुख्याध्यापक श्री नवनाथ सुडके यांनी सांगितले.*
