Halloween party ideas 2015

नवापूर येथील शेल्टर होममधुन पळालेल्या त्या युवकांना पकडले एलसीबीने...!
युवक आढळुन आले खातगाव रेल्वे स्टेशनवर..!

नवापूर- ता.२७ हेमंत पाटील
कोरणा व्या महा विषाणूने खान्देशात ही थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे देश, मोठी शहर ,जिल्हे त्यानंतर गाव पातळीवर ही कोरोणाने डंक मारला आहे प्रशासन आपले काम चोख बजावत असताना अनेक अडचणी येत आहे .आम जनता गंभीर होत नाहीये.ते कधी शहाणे होतील.असा प्रश्न पडला आहे.पर राज्यातून येणारे मजूर व त्यांना होमक्वारंटाइन केल्यानंतर काही दिवस राहुन त्यांच्या संयम सुटला असून ते पळून जात आहेत.नवापूर येथील शेल्टर होम मधून पळालेल्या युवकांना खातगाव स्टेशन वर नंदुरबार एलसीबी ने ताब्यात घेतले आहे.
लॉकडाऊन दरम्यान मध्यप्रदेश मधील ३४ युवक पायी जात असतांना नवापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत आरोग्य तपासणी करून शेल्टर होम अर्थात निवारा कक्षात ठेवले होते
कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी उपाय योजना म्हणून गुजरात राज्यातून पायी चालत जाणाऱ्या मध्यप्रदेशातील युवकांची नवापूर आरटीओ तपासणी नाक्या वरील हॉल येथे शासना कडून निवारा कक्ष येथे व्यवस्था करण्यात आली होती
दोन दिवसा पूर्वी कला वाणिज्य महाविद्यालयात नवापूर येथे ह्या ३४युवकांना ठेवण्यात आले होते
या युवकांनी दि २६ रोजी नित्कृष्ट जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता प्रशासना कडून त्याची तातडीने दखल घेत त्यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्या संबधी सांगितले असतांना रात्री च्या सुमारास ३४ युवका पैकी आठ युवकांनी शेल्टर होम चा दरवाजाची कडी तोडून पालयन केले होते अवघ्या काही तासात नंदुरबार एलसीबीच्या टीम ने खातगाव रेल्वे स्टेशन वर ह्या युवकांना ताब्यात घेतले असून नवापूर ला आणण्याची कारवाई सुरू आहे. नवापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी घराबाहेर निघू नये घरात राहावे नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळे यांचा मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरिक्षक किशोर नवले.
पोसई योगेश राऊत,पोहेकॉ
दीपक गोरे,पोहेकाँ महेंद्र नगराळे
पोहेकॉ दादाभाऊ वाघ,पोना प्रमोद सोनवणे,पोना शांतीलाल पाटील,पोना राकेश वसावे
मपोना पुष्पलात जाधव
पोकॉ जितेंद्र तोरवणे,पोकॉ
राजेंद्र कटके,पोकॉ विजय ढिवरे
पोकॉ यशोदीप ओगले,पोकॉ
सतीश घुले सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांनी कारवाई केली.युवक पळाली माहीती काँमन मँनला सर्वप्रथम कळाली होती सोशल मिडीयावर पोष्ट आल्याने सर्वच जागे झाले

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.