अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर पोस्टसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याने विशेष पोलीस अधिकारी म्हणून २२ जणांची नियुक्ती करण्यात आले. स्वेच्छेने नोकरी करण्यासाठी १९ माजी सैनिक व ०३ ऑन ड्युटी सैनिक मध्ये असलेले अशा लोकांचे टीम करण्यात आली असून कंटेनमेंट झोन व शहरातील गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या टीमचा वापर करण्यात येणार आहे
सदर टीम नियुक्ती पत्र हे माननीय उपविभागीय अधिकारी श्री राजेंद्र ससाने तसेच अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे तसेच सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ ढोबळे व गोपनीय अंमलदार शरद पाटील अशांनी सदर पथकाची नियोजन केले.
आवश्यकता भासल्यास अजून विशेष पोलीस अधिकारी नियुक्ती करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.