युवा सामाजिक कार्यकर्ते प्रविण महाजन यांच्या सामाजिक कार्याची घोडदौड!!
*विदयार्थी दशेपासून प्रारंभ झालेले समाज प्रबोधन ! ते क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे आज पर्येत राबवण्यात आलेले सामाजिक उपक्रम*
लोकप्रतिनिधींनी घेतलेली दखल*
विद्यार्थी दशेपासून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली क्रांतीसुर्य महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शालेय जीवनातच फुले दाम्पत्य यांच्या जीवन चरित्र आणि पुस्तके वाचनाची आवड निर्माण झाली आणि ज्वलंत क्रांतिकारी विचारांनी प्रभावित होऊन विदयार्थी दसेपासून ग्रामीण भागात सायकलीवरच प्रवास करून युवकांच्या भेटी घेऊ लागलो. पुढे
कॉलेजचे शिक्षण घेत असतांना प्रवासाला पैसे नसत म्हणून सायकलीवरच तालुका भ्रमण करायचो मग अनेक छोटे मोठे कार्येक्रम संपन्न होत असे आपण आर्थिक सक्षम नाही ही जाणीव परिस्थिती करून देत होती इतरत्र कामे करून संघटन करणे अशक्य आहे म्हणून गाव सोडले व काहीकाळ नाशिक गाठले तेथेही फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या प्रभावाखाली आलोच... आणि मधल्या काळात सामाजिक कार्ये थांबले काही वर्षांनी परत अमळनेर ला आलो सर्व सामाजिक कामे सोडली होती परंतु कोणता तरी सामाजिक प्रवाह असा यायचा की त्या मध्ये पुन्हा जाऊन भिडायचो पूर्ण चिंब व्हायचो सामाजिक कामे करत असतांना काहीही भान राहत नसे मग आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे तेव्हाच सामाजिक कामे ही करता येतील स्वतःचा व्यापार सुरू केला परिवारातील इतरांचेही लाईन लावली आणि काही वर्षांनी राहिलेली समाज सेवा पूर्णत्वास नेण्याची मनातील खंत स्वस्त बसू देत नव्हती!पुन्हा क्रांतिकारी विचारांचा प्रसार सुरू करण्याची इच्छा जागृत झाली....!✍️
प्रविण बी.महाजन ,अमळनेर
संस्थापक क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र्र राज्य
👉अनेक सामाजिक संघटना मार्फत फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा प्रसार करून सामाजिक संघटन बांधणीचा प्रयत्न केला. अनेक वर्षे अडचणींना सामोरे जाऊन उना तानात फिरून तन मन धनाने उपक्रम राबवलीत युवकांचा वापर फक्त ठराविक वेळ पुरता होऊ लागला त्यात समाज हित सोडून अंतर्गत स्वार्थाचा सुगंध दरवळत होता. परंतु इतरांचा झेंडा किती दिवस मिरवायचा या स्वतंत्र विचारांनी प्रभावीत होऊन मागील ७ वर्षा पासून क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच च्या माध्यमातून युवकांना सोबत घेऊन सामाजिक कार्यास सुरुवात केली.ती पुढील प्रमाणे
👉 शहरात महात्मा फुले जयंती विविध सामाजिक चळवळ च्या माध्यमातून कार्ये विनामूल्य वधु- वर परिचय सोहळे तसेच अनेक उपक्रम राबविण्यात आले त्यातील ठळक लक्षात राहणारी सामाजिक कार्य खालील प्रमाणे आहेत
👉 समाज संघटन मेळावा
देवळी येथे विधवा,अपंग,पांढरेकोड असलेल्या(ज्यांना समाजात शुभ कार्यास मानसन्मान दिला जात नाही) अश्या माता भगिनी महिलांच्या हस्ते मेळावा प्रतिमा पूजन सह उदघाटन करून समाज प्रबोधन पर मेळावा संपन्न
👉पातोंडा येथे समाज प्रबोधन वधू-वर मेळावा व समाज मंदिराचे पूर्वजांची जुनी वास्तू उजळणी करून पूजन व युवक मेळावा मोठ्या संख्येने युवकांनी उपस्थिती देऊन मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला
👉कळमसरे येथील जागृती मेळावा श्रीराम मंदिरात वधू-वर जनजागृतीपर संघटन अभियान युवकांची मोठी उपस्थिती
👉शिरूड येथे महिला सन्मान व युवक संघटन मेळावा मोठ्या प्रमाणावर संघटन कार्यास प्रतिसाद मिळून युवकांची मोठी गर्दी झालेली होती.
👉माळी वाडा येथे महिला सन्मान मेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न होऊन तालुक्यातील शाखा प्रमुखांचा गौरव सन्मान व मिरवणुकीने सर्व स्मारक पूजन करून वंदन करण्यात आले यावेळी सर्व नगरसेवक, समाजसेवक आजी माजी उपनगराध्यक्ष सरपंच समाज अध्यक्ष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
👉इतिहासात प्रथमच आमदार कार्यालयात माळी समाज व फुले प्रेमींचा जय जोती जय क्रांतीचा नारा देऊन परिसर दणाणून गेला होता.यावेळी आमदार शिरीष दादा यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले प्रतिमा पूजनाने जयंती उत्साहात साजरी यावेळी उड्डाण पुलास महात्मा फुले यांचे नाव देण्याची मागणी आमदारांनी मान्य केली सर्व नगरसेवक,नगरसेविका समाज सेवक तालुक्यातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य युवक बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते
👉इतिहासात प्रथमच माजी आमदार साहेबराव पाटील यांचे निवासस्थानी राज भवन येथे जय जोती जय क्रांतीने परिसर दुमदुमला अमळनेर नगरपरिषद नूतन इमारतीस महात्मा फुले यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली नेहमी पाठ पुरावा करण्यात आला याची दखल म्हणून लगेच न.पा. सभागृहात ठराव मंजूर होऊन न.पा. सभागृहास महात्मा फुले यांचे नाव देण्याचा ठराव सर्वानुमते पास फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा सन्मान करण्यात आला.
👉फुले दाम्पत्य भव्य स्मारकाची मागणी अमळनेर लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता भूषण मा.पुष्पलता ताई साहेबराव पाटील व माजी आमदार मा.साहेबराव दादा पाटील यांच्या कडे फुले दाम्पत्य भव्य स्मारकाची मागणी करण्यात आली.
👉 देवळी येथील संत सावता महाराज,महात्मा फुले यांचे स्मारकाची मागणी अमळनेर आमदारांकडे मागणी सतत कागदोपत्री पाठपुरावा करून शिष्टमंडळा सोबत आमदार कार्यालय येथे सतत बैठका संपन्न होऊन कामे पूर्णत्वास
👉महात्मा फुले व संत सावता महाराज स्मारकाचा भूमीपूजन सोहळा! देवळी येथील मागणीची आमदारांनी दखल घेऊन महात्मा फुले व सावता महाराज स्मारक यांचे भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाले यावेळी अनेक नागरिक जेष्ठ विचारवंत उपस्थित होते.
👉 पातोंडा,शिरूड,मुडी,जवखेडा येथे महात्मा फुले सभागृह व स्मारकाची मागणी नेहमी पाठ पूरावासाठी प्रयत्नशील अजूनही पाठपुरावा चालूच आहे.
👉संघटनेच्या माध्येमातून संपूर्ण महाराष्ट्रा सह गुजरात,मध्ये प्रदेश,राजस्थान या राज्यात सोसीयल मीडियाच्या वापर करून महाराष्ट्रातील व इतर राज्यातील हजारो समाज बांधवांना घर बसल्या वधु-वरांचे बायोडाटा उपलब्द करून अनेक विवाह जुडून आलेत समाजातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र ग्रुप तयार करून त्यांची समस्या सोडवण्यात आली या कार्याची दखल महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या प्रमुख न्यूज वृत्तपत्र प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी घेतली.त्यात मुंबई,पुणे,नगर,औरंगाबाद,जळगाव,धुळे,नाशिक,नंदुरबार खान्देश,मराठवाडा येथेही मीडियाने बातमी प्रसिद्ध करून कार्याची दखल घेतली आहे.पुणे येथील लोकमत समूहाने क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच प्रमुखांची मुलाखत छापून घेतली आहे.
👉ऐतिहासिक संत सावता गौरव पुरस्कार आयोजन : नाशिक विभागातील मोठे मंडळ संत सावता महाराज यांच्या कृपेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय क्रांती करणारे सामाजिक संघटना,महिला मंडळे, पंच मंडळे यांचा संत सावता पुरस्कार देऊन सन्मान करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन आहे आज पर्येंत असा सामाजिक मंडळांना कोणीही पुरस्कार दिलेला नाही असे ऐतिहासिक कार्ये संत सावता महाराज घडवून आणत आहेत संत सावता महाराज मंदिरे ट्रस्ट तसेच कोटीच्या घरात उलाढाल असलेल्या सामाजिक मंडळांना उत्साह आणि पाठबळ मिळावा त्यांच्या कार्याचा परिसरात गौरव नावलौकिक व्हावे पुढील काळात त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा योग्य सन्मान करणे ऐतिहासिक सोहळा आयोजित केला आहे.
संस्थापक अध्यक्ष
क्रांतीसुर्य महात्मा फुले विचारमंच सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख कार्येकर्ते महिला आघाडी महाराष्ट्र्र राज्य