" कोरोना " विशेष : गरजेचे
आदर्श शिक्षकाची आदर्श सामाजिक बांधिलकी
मनवंतराव साळुंखे यांनी आर्थिक वर्षाच्या प्रथम दिवशीच भरला मालमत्ता व पाणीपट्टी कर
पारोळा शहराचे रहिवासी महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मनवंतराव साळुंखे यांनी आपली आदर्श सामाजिक बांधिलकी जपत आज आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मागील प्रमाणे नगर पालिकेच्या कार्यालयात जावुन आपला मालमत्ता व पाणीपट्टी कर मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, दिपक अनुष्ठाण आरोग्य सभापती, संदिप साळुंखे कर निरीक्षक, किशोर उमप वसुली लिपिक यांच्या उपस्थितील भरून समाजा समोर पुन्हा कृतीयुक्त आदर्श ठेवला . गेल्या तीस वर्षात वेळेवर कर भरण्याची परंपरा त्यांच्या वडीलांपासुन आजही त्यांनी अबाधित ठेवली .
स्वच्छता पाहणी अभियानात उत्कृष्ट कार्याचे सन्मान पत्र त्यांना मागे नगर पालिकेने प्रदान केले आहे . त्यांच्या या स्तुत्य कृतीचे शहराचे लोक नियुक्त नगराध्यक्ष करण पाटील, उप नगराध्यक्षा सुनिता वाणी, राज्य शिक्षक स ध भावसार, पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले .
यावेळी प्रतिक्रिया देतांना साळुंखे म्हणाले आपण शाळेत असतांना नागरिक शास्त्र शिकतो . त्यात मानवी हक्क व कर्तव्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य व काम अभ्यासतो . बऱ्याचदा आपण हक्कांबाबत जागृती दाखवितो पण कर्तव्य मात्र विसरतो . या संस्था आपल्याला पथदिवे ,पाणी, गटारी, रस्ते , आरोग्य , स्वच्छता, अग्नीशमन अशा विविध सुविधा पुरवितात . या संस्थांना शासकिय अनुदानाबरोबर आपल्या हद्दीत निवास करणाऱ्या नागरिकांकडुन मालमत्ता व पाणीपट्टी कर गोळा करून आपले प्रशासन चालवावे लागते . शासकिय मदत वेळेवरच व पुरेशी मिळेल असे नाही म्हणुन या सुविधा आपल्याला नियमित व वेळेवर मिळण्यासाठी आपण आपल्याला आकरलेला कर लवकरात लवकर भरणे गरजेचे व महत्वाचे आहे .असे करून आपण स्वतःला व आपल्या बांधवांनाच एक प्रकारे मदत करतो . सध्या कोरोना मुळे नगर पालिका व शासनावर ताण व बोजा अधिकचा पडत आहे म्हणुन सर्व शहरवासियांना विनंती की आपल्याकडे नगर पालिकेची मागिल थकबाकी असेल ती व या आर्थिक वर्षाचा कर शक्य तेवढया लवकर भरणा करून पालिकेला अधिक जोमाने विकास कामे करण्यासाठी मदत करावी .
