अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सध्या संपूर्ण देशाला हैराण करणाऱ्या कोरोना नावाच्या विषाणूमूळे शासन नाकीनऊ आलेतरी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.. त्यासाठी जनतेचा पाठिंबा असला तर कोरोनाचा नायनाट करता येईल. परंतू काही नागरिक नियमाचे उल्लंघन करून नियम धाब्यावर बसवून फिरतांना दिसतात.. स्वयमशिस्त पाळणे हेच कोरानावरचा इलाज आहे. यासाठी प्रशासनाला जनतेने सहकार्य करावे.. अशी अपेक्षा..
अमळनेर तालुक्यातील चिमणपुरी आश्रमशाळेचे शिक्षक कोरोनो नावाच्या विषाणूपासून सावधान राहिले पाहिजे. आपण आपल्या घरीच राहावे.कुठेही फिरायला जाऊ नये यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांच्या समाजप्रबोधनपर गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवसांचा लॉक डाऊन व मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संचारबंदी केली मी सतीष कागणे आश्रमशाळा पिंपळे ब्रु।। ता.अमळनेर जि. जळगाव येथील शिक्षक त्यावरील एक जन जागृती गीत सादर करतोय कृपया लोकांनी खरंच घरात बसा लॉक डाऊन गांभीर्याने घ्या संचारबंदी समजून घ्या हो साखळी तोडून कोरोनाला हारवूया