Halloween party ideas 2015



सर्व विद्यार्थी, पालक बंधू भगिनी यांना विनम्र आवाहन करतो की कोरोना (कोव्हिड 19,विषाणूंचा )
प्रादुर्भाव टाळणे कामी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण देशाला , महाराष्ट्राला लॉक डाऊन केले असून 21 दिवस प्रत्येकाला घराबाहेर न पडण्याचे आदेश दिलेले आहेत . सदर आदेश हे केवळ आपल्या स्वतःचे , परिवाराचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून् दिलेले नाहीत तर संपूर्ण मानव जातीच्या हितासाठी दिलेले आहेत याचे भान राहू दया . आज घडीला आपल्या देशात कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रातच जास्त आहे .विशेष करून पुणे , मुंबई येथील . उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबातील कुणीतरी त्या ठिकाणी असेल किंवा घरी परतला असेल तर खबरदारी म्हणून शासनाच्या ध्येय _ धोरणानुसार आपण त्यांची काळजी घेणे ,वैदयकीय तपासणी करून घेणे क्रमप्राप्त आहे.
आपण सर्वांनी शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे , आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणेबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे . यासाठी सातत्याने आपणांस सरकारी यंत्रणा , पोलिस यंत्रणा , वैद्यकीय यंत्रणा , नगरपालिका प्रशासन , सामाजिक संघटनांचे सहकार्य मिळत आहे . म्हणून मी साने गुरुजी नुतन माध्य विदयालयाचा मुख्याध्यापक एस डी देशमुख आपणांस सर्वांना नम्र विनंती करतो की शासकीय आदेशांचे पालन करा . आपल्या सह , कुटुंबाचे , मानवजातीचे आरोग्य जपू या , व सर्वांना कोरोना या आजारापासून दूर ठेऊ या .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.