क्रिकेटच्या खऱ्या सुत्रधारांचे वेतन
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय द्वारे आयोजित केले जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांशी संबंधीत असे महत्वाचे व्यक्ती म्हणजे क्यूरेटर. क्युरेटर म्हणजे प्रत्यक्ष सामना ज्या खेळपट्टीवर खेळला जातो ती बनविणारी जबाबदार व्यक्ती. अंपायर म्हणजे मैदानातील सामन्याचे नियंत्रण करण्याऱ्या व्यक्ती. तर रेफ्री म्हणजे संपूर्ण सान्यावर नियंत्रण ठेवणारी सामनाधीकारी म्हणून वावरणारी व्यक्ती.
बीसीसीआयशी करारबद्ध अशा खेळाडूंना चार श्रेणीमध्ये विभागले गेले आहेत. त्यात अ - प्लस, अ, ब व क श्रेणींचा समावेश आहे. अ - प्लस श्रेणीत असलेल्या खेळाडूंना वार्षिक ७ कोटी, अ - श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब -श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी व क - श्रेणीतील खेळाडूंना २ कोटी वार्षिक मानधन मिळते. पूर्वीच्या प्रशासकीय समितीने विभागीय क्यूरेटर्सचे वार्षिक वेतन ६ लाखांहून १२ लाखांपर्यंत वाढविले. तसेच सहायक क्यूरेटर्सचे मानधन ४. २ लाखांवरून ८. ४ लाखांपर्यंत वाढविले.
आपल्याला माहिती आहे की, खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी मानधनही मिळते. परंतु त्यांच्या पेक्षा जास्त मेहनत घेणारे पंच, सामनाधिकारी, क्युरेटर, स्कोअरर व व्हिडीओ अनालीस्टला किती मानधन मिळते. या संबंधी आपण या लेखात जाणून घेऊ या.
बीसीसीआयकडे सध्या १०५ पंच आहेत. त्यातील सर्वोत्तम वीस जणांचा एक वेगळा ग्रुप बनविला आहे. सन २०१२ पासून या पंचांना कोणत्याही प्रकारची वेतन वाढ मिळाली नव्हती. परंतु आता तिच्यात दुप्पटीने वाढ करण्यात आली असून ती प्रतिदिन वीस हजाराहून चाळीस हजार करण्यात आली. सर्वोत्तम - २० मधील पंचाना एका टि २० चे पूर्वी १o,ooo रुपये मिळायचे ते आता २o, ooo रुपये इतके मिळतात. तर शिल्लक राहिलेल्या ८५ पंचांना एका टि - २० सामन्याचे १५ हजार तर वनडे व कसोटीसाठी १५ ते ३० हजार इतके मानधन करण्यात आले. याशिवाय पंचांना मिळणाऱ्या दैनिक भत्त्यातही ७५० रुपयांवरून १५०० रुपये इतके करण्यात आले.
टॉपच्या २० पंचांना सध्या ४oooo, इतर सर्व पंचांना ३००००, मॅच रेफ्री ३oooo स्कोरर १०००० सिनियर व्हिडीओ एनालिस्ट १५ooo, सहाय्यक व्हिडीओ एनालिस्ट १oooo रुपये प्रतिदिन इतकी करण्यात आला आहे.
बीसीसीआयकडे सध्या ५८ सामनाधिकारी आहे जुने खेळाडू आहेत. टि - २० सामन्यांव्यतिरिक्त या लोकांना मिळणारे प्रतिदिन मानधन १५ हजारांवरून ३० हजार इतके करण्यात आले. टि - २० सामन्यांंसाठी हि फी ७५oo वरून १५००० हजार इतकी करण्यात आली. सामनाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या दैनिक भत्त्यात ७५० वरून १५०० इतकी वाढ बाह्य सामन्यांसाठी तर स्थानिक सामनाधिकाऱ्याास ५oo रुपयांवरून १००० रुपये प्रतिदिन इतकी करण्यात आली.
बीसीसीआयकडे १५३ नोंदणीकृत धावलेखक आहेत. धावलेखक (स्कोअरर ) संपूर्ण सामन्यांची आकडेवारी संकलीत करून जतन करतात. यांची फी प्रत्येक सामन्यासाठी पाच हजार वरून दहा हजार केली आहे. मात्र टि २० सामन्यासाठी पाच हजार रुपये मिळतील. सिनियर व्हिडीओ विश्लेषकाला ७५०० तर सहाय्यक विश्लेषकाला पाच हजार रुपये इतकी प्रतिदिन करण्यात आली.
लेखक : - दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल प्रतिनिधी भारत
.Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.