Halloween party ideas 2015




जागतिक महीला दिनानिमित्त सौ वसुंधरा लांडगे यांचा सन्मान


अमळनेर प्रतिनिधी

जागतिक महीला दिनानिमित्त....

अमळनेर तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांत नावलौकिक काम करणाऱ्या व उत्कृष्ट सूत्रसंचालन करणाऱ्या व ज्या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला आतापर्यंत 50 ते 60 पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या
सानेगुरुजी शाळेच्या शिक्षीका,खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त, सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीच्या संचालीका सौ वसुंधरा दशरथ लांडगे यांचा जागतिक महीला दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र शाल,बुके देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन,सल्लागार दशरथ लांडगे उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देतांना सौ वसुंधरा लांडगे म्हणाल्या कि
महीला दिनाचे औचित्य साधून माझ्या भावाने सन्मान केला मी मनापासून आभार मानते.हा सत्कार मला कार्य करतांना प्रेरणादायी राहिल असे सांगितले.



फोटो


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.