Halloween party ideas 2015


कोरोनामुळे यंदा कलाकारांवर उपासमारीची वेळ,शासनाने आर्थिक पँकेज जाहिर करावे !. डॉ अजय मोरे यांची मागणी

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) संपूर्ण जगतात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून त्याने देशासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असून त्याचा आर्थिक तीव्र फटका ज्यांचे हातावर पोट आहे अश्या घटकाला बसला असून प्रामुख्याने सांस्कृतिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे,कलाकारांचे मार्च,एप्रिल , मे हे महिने हंगामाचे असतात या महिन्यात कार्यक्रम करून पुढील वर्षभराची आर्थिक तरतूद उपजीविके साठी ते करत असतात.
मात्र सध्या कोरोना मुळे देशात व महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्यामुळे या घटकातील कलाकारांवर उपास मारीची वेळ आली आहे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत उदरनिर्वाहाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे , त्या कलाकारांना कला सादर केल्या शिवाय मानधन मिळत नाही. आणि त्याशिवाय त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकत नाही , कलाकार संवेदनशील आहे मनातील दुःख बाजूला ठेवून ते रसिकांचे मनोरंजन करत असतात येईल त्या संकटाला सामोरे जात असतात.
परंतु कोणत्याही कलेला राजाश्रय मिळाल्या शिवाय लोकाश्रय मिळत नाही हे आपण जाणता सर्व कलाकार सरकार कडे या गंभिर स्थितीत आपण मदतीचा हात द्याल आणि त्यांना साथ द्याल या आशेने आपल्या कडे पाहत आहेत तरी समस्त कलाकाराच्या वतीने आपल्याला या निवेदनातून विन्नती करण्यात येते की या कोरोना च्या धर्तीवर लॉकडाऊन काळात आपण कलाकारांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे व त्यांचासह कुटुंबियांना दिलासा द्यावा. असे निवेदन चित्रपट व सांस्कृतिक, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष - श्री. बाबासाहेब पाटिल, प्रदेश सरचिटणीस - श्री. वंदन नगरकर आणि कोकण विभाग अध्यक्ष डॉ.अजय आत्माराम मोरे यांनी शासनाकडे केली आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.