Halloween party ideas 2015


उरुळी कांचन,(वार्ताहर):-
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ५ वर्षे खालील वयोगटातील मुला-मुलींना पल्स पोलिओ चा डोस पाजण्यात आला या केंद्रांमध्ये परिसरातील सर्व माता-भगिनी आपल्या पाच वर्षे वयोगटातील मुलांना प्लस पोलिओ डोस देण्यासाठी असंख्य महिला उपस्थित होत्या. अतिशय अतिदक्षता त्याची काळजी घेऊन डॉक्टर सुचिता कदम व आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी घेऊन आलेल्या माता-भगीनीच्या मुलांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. यावेळी उपस्थित जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, सरपंच राजश्री वनारसे, डॉ. संदीप सोनवणे, आरोग्य सेवक बी.आर.जाधव, उपस्थित होते. तसेच डॉ. रवींद्र भोळे यांच्या दवाखान्यातही जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, उपसरपंच सुनिल कांचन , डॉ. संदीप सोनवणे, पत्रकार अमोल भोसले, नंदकुमार मुरकुटे यांच्या हस्ते पोलिओचा डोस पाजण्यात आला .

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.