Halloween party ideas 2015


प्रताप महाविद्यालयात वाणिज्य विषयाच्या राष्ट्रिय चर्चासत्राचा समारोप

अमळनेर :

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व महाराष्ट्र वाणिज्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रिय चर्चासत्राचा आज समारोप झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख अथिती म्हणुन ओमप्रकाश मुंदडे,अमेय मुंदडे ,संस्थेचे अध्यक्ष अनिल कदम,विश्वस्थ वसुंधरा लांडगे, चिटणीस डॉ. अरुण कोचर, डॉ. जी. वाय. शितोळे,निशिकांत झा,कुलदीप शर्मा,जी.एम.तल्हार ,शिवप्रसाद डोंगरे,संस्थेचे संचालक निरज अग्रवाल,योगेश मुंदडे,जितेन्द्र जैन,प्राचार्या डॉ. ज्योती राणे,समन्वयक प्रा.एस ओ.माळी उपस्थित होते.
दोन दिवसीय राष्ट्रिय परिषदेचा आढावा प्रा.उषा माधवानी यांनी मांडला. डॉ. शितोळे यांनी बेस्ट पेपर अवार्ड,पीएच.डी पदवी प्राप्त प्राध्यापक,संशोधन मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार केला. त्यात प्रा. कल्याणी,डॉ. प्रतिभा पाटील,डॉ. योगेश तोरवणे,डॉ. श्याम साळुंखे , कु.वृषाली विरेन्द्र शहा(अविष्कार स्पर्धेत राज्यस्तरीय निवड) यांचा समावेश होता.
डॉ. तल्हार, डॉ. शितोळे,शिवप्रसाद वंगा रे,डॉ. साळुंखे यांनी संसाधन व्यक्ति म्हणुन काम पाहिले.प्रमुख अतिथी चा परिचय डॉ. विजय तुन्टे यांनी करुन दिला. ओमप्रकाश मुन्दडे यांनी मार्गदर्शनकेले.अमेय मुन्दडे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठीचे मूलमंत्र सांगितले.प्रदीप अग्रवाल यांनीअध्यक्षीय भाषण केले. डॉ. कल्पना पाटील,प्रा. डी. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. ओ.माळी,प्रा. किशोर जगदेव,डॉ. तोरवणे,प्रा. मराठे,प्रा. सूर्यवंशी,प्रा. भागवत,प्रा. झलके यांनी परिश्रम घेतले . डॉ श्याम साळुंखे यांनी आभार मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.