सार्व. बांधकाम विभागाने लक्ष घालून दुरुस्ती करण्याची गरज...
अमळनेर :- मारवड रस्त्यावरील उड्डाणपूल ते क्रीडा संकुल या दरम्यान रस्त्यावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
उड्डाणपूल संपल्यावर प्रताप महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर दुरुस्ती केलेल्या खड्ड्यामधील मुरूम निघाल्याने अनेक विद्यार्थी, प्रवाशांच्या गाड्या सायकली घसरल्याच्या घटना घडत आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांचा या रस्त्यावरून वावर नसल्याने त्यांना हे खड्डे दिसत नसल्याचा अंदाज आहे. मात्र प्रवाश्यांना या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. मागील वेळी वरवर डागडुजी केलेल्या खड्ड्यामधिल मुरूम निघाला आहे. त्यामुळे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ह्या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हे दुरुस्ती पूर्ण करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.