डॉ राजेंद्र महाजन
संपर्क प्रमुख व
समन्वयक शिक्षण विभाग जळगांव
अमळनेर तालुक्यातील निष्ठा प्रशिक्षण तिसऱ्या टप्प्याचा समारोप.
अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर तालूकास्तरीय निष्ठा प्रशिक्षण
निष्ठा प्रशिक्षण तिसरा टप्पा जी एस हायस्कूल अमळनेर येथे दिनांक १३ / १ / २०२०ते दिनांक १८ / १ / २०२०या काळात यशस्वीरित्या संपन्न झाले आज शेवटच्या दिवशी निरोप समारंभ झाला त्यात अध्यक्षस्थानी डॉ राजेंद्र महाजन होते अमळनेर तालूका संपर्क अधिकारी प्रमूखपाहूणे म्हणून गट शिक्षणाधिकारी आर डी महाजन पं स अमळनेर हे होते
पाच दिवस शिस्तीत परंतु हसतखेळत पाचही KRP यांनी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी केंद्रित, सर्व प्रशिक्षाणार्थी शिक्षक बंधू , भगिणी यांच्याकडून कृतीयुक्त अध्यापन करून आनंददायी अध्यापन केले
या पाच दिवसात घेतलेले विषय
१ ) शालेय नेतृत्व संकल्पना व उपयोजन
२ ) शाळापूर्व शिक्षण
३ ) शाळेतील पूर्व व्यावसायिक शिक्षण
४ ) अध्ययन_ अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टिकोनाची उपयुक्तता
५ ) शालेय शिक्षणातील पुढाकार
या पाचही घटकांचे विस्तृत सहज सूलभ सोपे करून वेगवेगळ्या कृत्या करून उत्कृष्ट अध्यापन केले याचा उपयोग शाळेवर विदयार्थ्याना नक्कीच फारच फायदा होणार आहे या प्रशिक्षणामुळे शाळा विदयार्थी बोलके होतील सर्व तंत्र वापरुन इयत्तेनुसार क्षमता पूर्ण होवून गुणवत्तापूर्ण , दर्जेदार अध्यापन करता येईल बालमानसशास्त्राचा अभ्यास करून आनंददायी अध्यापन होईल व त्यामुळे विद्यार्थी उपस्थितीवरही चांगला परिणाम होईल असे प्रशिक्षणार्थीनी मनोगतात सांगितल
डॉ महाजनसाहेब यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की प्रशिक्षण आज संपले नसून आजपासून आता घेतलेले प्रशिक्षणातून नेतृत्वगुण आपणास आपआपल्या शाळेत सुरुवात करावयाची आहे असे सांगितले आम्ही पाचही तंज्ञमार्गदर्शकांनी दिलेले जसेचे तसे आपल्या विद्यार्थ्याना दया अजून जास्तीची माहिती मिळवून विदयार्थी केंद्रबिंदू मानून दया आपण त्यांचे मानबिंदू आहात आपण ३० % बोलावे विदयार्थ्याना ७० % क्रिया करू दया आपली भूमीका मार्गदर्शकाची असावी प्रत्येक मूल शिकू शकत त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी असे सांगितले तसेच विशेष या प्रशिक्षण वर्गास पूर्ण पाच दिवस पाचही केंद्रप्रमूख प्रशिक्षणार्थी म्हणून पूर्ण वेळ उपस्थित राहिले त्यांचे अभिनंदन आणि . तिसऱ्या टप्प्यातील सर्व प्रशिणार्थी यांनी अध्ययन अध्यापनात उत्कृष्ट सहभाग घेतला
KRP म्हणून डॉ राजेंद्र महाजन , भगवान पाटील , भानुदास पवार , तुषार बाविस्कर , देवेंद्र पाटील , प्रमोद पुनवटकर यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश पाटील व आभार प्रदर्शन योगेश पाटील यांनी केले
यावेळेस अमळनेर तालुक्यातील केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील व सर्व केंद्रप्रमुख व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
फोटो