अमळनेर प्रतिनिधी- कासोदा तालुका एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते नुरुद्दिन मुल्लाजी यांना सुवर्णकाळ फाउंडेशन व संत नरहरी सोनार युवा फाउंडेशन ग्रुप आयोजित नाना शंकरशेठ राष्ट्रीय स्मृती पुरस्कार 10 फेब्रुवारी रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तर त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव होत असल्यामुळे त्यांचा सत्कार अंमळनेर येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.
नुरुद्दिन मुल्लाजी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात प्रकाश गायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहेत त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना 10 फेब्रुवारीला जळगाव येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर येथे करण्यात आला.
त्यांच्या सत्कार प्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी निरंजन पेंढारे ,विजय पाटील, शरद पाटील ,संजय सूर्यवंशी, भूषण चौधरी ,पंकज लोहार ,भूषण बिरारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नरुउद्दीन मुल्लाजी म्हणाले की महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर यांनी माझा यथोचित सत्कार केला. त्याबद्दल मी महाराष्ट्र पत्रकार संघाचा मनस्वी ऋणी राहील व मला भविष्यात कार्य करण्यास प्रेरणा मिळेल असे सांगितले.