अमळनेर प्रतिनिधी
पोदार जंबो किड्स अमळनेर येथे आज दिनांक 17/01/2020. रोजी *विज्ञान प्रदर्शन* भरविण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित अतिशय सुंदर माँडेल्स बनवुन आणले होते. माँडेल्स पुढील विषयांवर आधारित होते. 1) Means Of Transport. 2) Safety At Home. 3) Good Touch Bad Touch 4) Seed Germination 5) Water Cycle 6) Farm Animals 7) Types of Animals 8) Rainy Animals 9) Good Habits 10) Solid Liquid n Gas. 11) Birds And Their Parts 12) Rainy Wear 13)Body Parts. 14Traffic Signals...etc
या विज्ञान प्रदर्शनाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली त्यात ग्लोबल व्ह्यू इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य श्री. एल. लक्ष्मण सर व त्यांचे सहकारी तसेच माँडर्न काँम्युटर्सचे संचालक श्री. नितीन कोल्हे सर व सौ. विद्या कोल्हे मँडम. तसेच प्रताप काँलेजचे माजी प्राचार्य श्री. द वा भामरे सर ( सेक्रेटरी ला वा पंच मंडळ ) प्रा प्रविण देशमुख सर तसेच रवी एजन्सीज चे प्रोप्रा. दिपक तलवारे श्री. सुबोध पाटील सर श्री. स्वप्निल पाटील सर इत्यादी मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा देऊन कौतुक केले. वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्था संचालक श्री. प्रशांत कुडे सर व सौ. निलीमा कुडे मँडम व सर्व स्टाफ त्याचबरोबर विद्यार्थी व पालकांचे व मित्र परीवाराचे अनमोल सहकार्य लाभले.
दिनांक 18/01/2019 रोजी विद्यार्थ्यांसाठी *स्पोर्टस डे* (सकाळी 9-12) मराठा काँलनी जवळील मोकळी जागा. पटवारी काँलनी जवळ.येथे आयोजित करण्यात आला आहे व दिनांक 19 -01-2020 रोजी *वार्षिक स्नेहसंमेलन* ( सकाळी 9-12 ) जुना टाऊन हाँल लोकमान्य शाळेसमोर आयोजित करण्यात आले आहे असे श्री. प्रशांत कुडे सरांनी कळविले आहे.