Halloween party ideas 2015


अमळनेर जनतेचे एन आर सी ,सि सि ए...गो बॅक आंदोलन....


अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर प्रचंड संख्येने एकत्रित येत अमळनेरच्या जनतेचे एन आर सी ,सि सि ए...गो बॅक महाधरणे आंदोलन लक्षवेधी ठरले.हजारोंच्या संख्येने तिरंगा झेंडे हातात घेऊन लोकशाही बचाव नागरी कृती समितीच्या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक एन आर सी कायद्याच्या विरोधात आजच्या जनआंदोलनात एकवटलेले दिसले.
' देशातील जनतेत धार्मिक फूट पडण्याचा डाव आम्ही भारताचे लोक एकजुटीने उधळून लावू!' असा एकतेचा सूर आजच्या धरणे आंदोलनातून वक्त्यांनी व्यक्त केला.दुपारी सुरू झालेल्या आंदोलनात एन आर सी , सी सी ए गो बॅक च्या घोषणा देत गल्ली-बोळातून , नगर-मोहल्ल्यातून हातामध्ये तिरंगा झेंडा आणि केन्द्र सरकारच्या कायद्याच्या विरोधातील घोषणा फलक घेऊन हजारोच्या संख्येने महिला,युवती तरुण अबाल वृद्ध उत्स्फूर्तपणे प्रांताधिकारी कार्यालयासमोरील मैदानात सुरू झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने मैदान फुल्ल होत धुळे रोडवरही गर्दी उसळली आणि काहीकाळ रहदारी इतरत्र वळवावी लागली. 'महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात होऊ देणार नाही!'असे आ.अनिल भाईदास पाटील यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणात सांगितले.'एकजुटीने संघटितपणे मोदी शहांच्या कायद्याचा विरोध करू असे प्रा.अशोक पवार, डॉ.अनिल शिंदे,विश्वास पाटील,ऍड.शकील काझी,मनोज पाटील आदिंनी केलेल्या भाषणातून सांगितले. तर रियाज मौलाना व मुस्लिम समाजातील महिला कार्यकर्त्या सलमा बाजी यांनी , 'पंतप्रधानांनी मुस्लिमांच्या विरोधात अनेक कायदे केले आम्ही संयम ठेवला ,मात्र या मातीशी आमची नाळ तोडण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही ! असे ठणकावून सांगितले तर कुमारी चिष्टीया नाज हिने 'या देशाच्या मातीत आम्ही जन्मलो आणि याच मातीत मिसळू, आम्ही कमजोर मुळीच नाही !' असे सांगितले. एन आर सी व सी सी ए कायदा समजवून देत प्रास्ताविक प्रा.लिलधार पाटील यांनी केले.तर 'आझादी आझादी,भुखमरी से आझादी, बेरोजगारी से आझादी,तानाशाही से आझादी, लेके रहेंगे आझादी, तुम कुछ भी करलो, हम लेंगे आझादी। या घोषगीताने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आंदोलन स्थळी जोश भरला.तर समता कला मंच चे गौतम सपकाळे,सिद्धार्थ सपकाळे, भारती मोहिते,भूषण शिरसाठ,आकाश साळवे, यांनी हातात डफ वाजवत इनक्लाब जिंदाबाद च्या घोषणा गीतांनी तर शाहरुख सिंगर यांनी देशभक्ती पर विर गीतांनी वातावरण निर्मिती केली.यावेळी दलित नेते रामभाऊ संदानशिव, राष्ट्र सेवा दलाचे प्रांताध्यक्ष गोपाळ नेवे,प्रविण जैन,गोकुळ बोरसे,नगरसेवक नरेंद्र संदानशिव,नगरसेवक श्याम पाटील,फिरोज पठाण,शेखा हाजी, कॉम्रेड लक्ष्मण शिंदे,गोकुळ बोरसे,पत्रकार राजेंद्र महाले,इम्रान खाटीक,सत्तार मास्टर,धनगर दला पाटील, प्रा.शिवाजीराव पाटील, ऍड रणजित बिऱ्हाडे,यशवंत बैसाणे,प्रा.जयश्री साळुंखे,पन्नालाल मावळे,संतोष लोहेरे,बन्सीलाल भागवत,अरुण नेतकर,गुलाम नबी,मुख्तार खाटीक,असलोमोद्दीन काझी, अरुण देशमुख,ऍड अमजद खान,ऍड अश्फाक सैययद,फयाज खा पठाण,हिम्मत पाटील,नाविद शेख, मयूर पाटील,पत्रकार मुन्ना शेख,आबीद अली,सत्तार दादा, प्रा विजय गाडे, सोमचंद संदानशिव,शराफत अली, रणजित पाटील,भूषण भदाणे,तुषार संदानशिव आदिंसह मोठ्यासंख्येने सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत होऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. तर अल्पसंख्याक महिला भगिनींनी आ.अनिल पाटील व सामाजिक राजकिय पदाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांना निवेदन दिले.
हम भारत के लोग या बॅनर खाली लोकशाही बचाव नागरी कृती समिती व संविधान बचाव कृती समिती यांनी आयोजित केलेल्या आंदोलनास भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रसेवा दल, अनिस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय कांग्रेस पार्टी, समता कला मंच, भारतीय बौद्ध महासभा, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, रेल कर्मचारी कृती समिती, रिपब्लिकन पँथस जातीअंतची चळवळ, समता विद्यार्थी आघाडी, शिवशाही फाऊंडेशन, छात्र भारतीय, आवाज फाउंडेशन, अमळनेर वकील संघ, गावराणी जागल्या, शिव बहुद्देशीय प्रतिष्ठान, स्वाभिमानी शेतकरी संघटन,लोकसंघर्षा मोर्चा,राजमुद्रा फाउंडेशन, इंडियन स्टार ग्रुप, रजा ग्रुप कसाली, अलफेज स्कुल ग्रुप, जमियत उलेमा हिंद, शाहाआलम सोशल ग्रुप, चिशतीया ग्रुप, शेरे हिंद ग्रुप, वंचीत बहुजन आघाडी, नशोमन ग्रुप, रजा मुस्तफा ग्रुप, दस्तगिर ग्रुप, नागरी हित दक्षता समिती,समता सैनिक दल, आदिवासी एकता संघर्ष समिती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद,खाँज़ा नवाज गरीब ग्रुप,आदिवासी पारधी विकास परिषद ,आदिंसह अनेक सामाजिक संस्था,संघटनानी आंदोलनास पाठींबा जाहीर केला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.