Halloween party ideas 2015


सोशल मीडियाच्या आवाहनावरून नाभिक समाज बांधवांनी दिली गरीब विद्यार्थ्यांसाठी दिली मोफत सेवा।
पारोळा -श-प्र -नाभिक समाज मंडळाकडुन आदिवासी विदयार्थ्यांनाग शाळेतच केश कर्तनाची सेवा देण्यात आली.
पत्रकार अभय पाटील पारोळा व पत्रकार मनोहर केदार लोणी यांच्या सहकार्याने सोशल मेडियाच्या माध्यमातुन या बाबत आवाहन केले होते।
दि १७ शेळावे ता पारोळा जि प प्राथमिक शाळा धाबे ता पारोळा या शाळेवर ३१ विदयार्थ्यांपैकी ३० विदयार्थ्यांनी आज केशकर्तनाचा लाभ घेतला .
अभय पाटील हे आपल्या सोशल मिडीया ग्रुपच्या माध्यमातुन अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन करीत असतात . त्याला अनेक समाजप्रेमी बांधव सकारात्मक प्रतिसाद देत असतात . ग्रामिण गरिब बालकांना स्वेटर व शैक्षणिक साहित्य वाटप , पाऊस ग्रस्त लोकांना आर्थिक मदत, धान्य कपडे, संसारोपयोगी वस्तु , गरम शाल वाटप यासह आदिवासी विदयार्थ्यांची शाळेत केश कर्तन पथक नेऊन कटिंग करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत .
याचाच एक भाग म्हणुन पत्रकार अभय पाटील , बापूसाहेब नावरकर , डॉ रविंद्र निकम , मनोहर केदार यांच्या सह केशकर्तनकार संजय सैंदाणे अध्यक्ष सेनाजी बहु उद्देशिय संस्था लोणी बु , रविंद्र वारुळे नगाव , योगेश वारूळे , नगाव , किशोर पवार पळासखेडे, कैलास सोनवणे मोरफळ यांच्या पथकाने एकूण 20 विदयार्थ्यांची सुंदर कटिंग करून त्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले . तसेच संजय सैंदाणे यांनी शाळेतील ५३ विद्यार्थीनींना खाऊ वाटप बिस्किट पुडे खोबरे तेल पाऊच वाटप केले .
धाबे या गांवात केशकर्तनालय नाही . विदयार्थी पालक बाजाराच्या दिवशी त्यांना केश कापण्यासाठी शहरात आणतात . कधी कधी कंटाळा होतो उशिर होतो पैसे नसतात . सध्या बऱ्याच विदयार्थ्यांचे पालक बाहेर राज्यात ऊस तोडणी कामावर गेले आहेत . त्यामुळे शाळेतच जागेवर त्यांना काटिंग करून मिळाल्याने त्यांना खुप आनंद झाला . विद्यार्थी स्वच्छ व सुंदर दिसु लागले .
ही छान सेवा दिल्याबद्दल वरील सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी स्वागत करून आभार मानले . तसेच यापुढे नियमित शाळेवरच विदयार्थ्यांना ही सेवा देण्याचे अश्वासन दिले .डॉ रविंद्र निकम शाळेतील सर्व ५७ विदयार्थ्याना टुथ ब्रश , टुथ पेस्ट व हिवाळ्यासाठी व्हॉसलिन डब्या वाटप करण्याचा मनोदय व्यक्त केला।
वरील उपक्रमाचे पारोळा तालुक्याचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी धरणगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अशोक जी बिर्हाडे यांनी अभिनंदन केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.