Halloween party ideas 2015


*आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांनी दिली मोबाईलवर कल चाचणी व अभिक्षमता चाचणी* 
      
धरणगाव(दि.28)आदर्श माध्यमिक विद्यालय धरणगाव येथील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी सन-2019-20 या शैक्षणिक वर्षात दिली अँड्रॉइड मोबाईल द्वारे दिली ऑनलाईन कल चाचणी व अभिक्षमता चाचणी

       विद्यार्थांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे त्याची आवड,त्याचा रस या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याचे कलमापन केले जाते, दहावी नंतर त्याला सहज यशाचा मार्ग मिळावा,आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळावी म्हणून दरवर्षी ही परीक्षा राबविण्यात येते
         
            महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद(विद्या प्राधिकरण),पुणें व श्यामची आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कल चाचणी सन-2019-20 मध्ये राबवली जात आहे साधारणपणे 27 डिसेंबर ते 17 जानेवारी 2020 पर्यंत ही ऑनलाईन परीक्षा कॉम्प्युटर किंवा अँड्रॉइड मोबाईल वर घेण्यात येत आहे
      
       विद्यालयातील एकूण 62 विद्यार्थी या शैक्षणिक वर्षांत दहावीला प्रविष्ट आहेत पैकी 51 विद्यार्थ्यांनी मुदतीच्या दुसऱ्या दिवशी मोबाईल द्वारे कलचाचणी दिली उर्वरीत विद्यार्थी सोमवार दि 30 रोजी ही परीक्षा देणार आहेत

       ही चाचणी चार विभागात विभागली गेली असून भाषिक क्षमता, तार्किक, अवकाशीय, व सांख्यिकीय क्षमता परीक्षणासाठी दिले गेलेले आहेत व अभिक्षमता चाचणी साठी साधारणपणे दीड तास वेळेची मर्यादा दिली गेली असून www. mahasscboard.in या संकेतस्थळावर लॉगीन करून *करिअर मित्र झिप फाईल* मधून विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे

         या परिक्षेचे नियोजन विद्यालयाचे विज्ञान शिक्षक मुकेश तोरवणे, व गणित शिक्षक तुषार नाईक यांनी केले असून सर्वच शिक्षकाचे सहकार्य लाभले आहे

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.