Halloween party ideas 2015


'जिल्हा परिषद अध्यक्ष चषक' अमळगाव केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद व पिंगळवाडे शाळांची सरशी

जि.प.अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा उपक्रमांतर्गत... 
अमळगाव केंद्रातील जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न...

अमळनेर प्रतिनिधी, आज दि.28-12-2019 वार शनिवार रोजी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी शिक्षण समिती जि.प.जळगाव यांनी सुचवलेल्या उपक्रमाची अंमलबजावणी म्हणून अमळगाव केंद्रातील जि.प.शाळेत इ.1 ली ते 8 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा अमळगाव येथील आदर्श हायस्कूल अमळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.सदर केंद्रस्तर क्रीडास्पर्धांचे उदघाटन अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी.धनगर साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.गोकूळ आनंदा पाटील, अमळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.श्री.प्रकाश पाटील सर, क्रीडाशिक्षक रविंद्र पाटील सर, सहाय्यक शिक्षक नितीन सोनवणे सर, अनिल बैसाणे सर, रामसिंग पाटील सर, विनय सोनवणे सर यांची प्रमुख उपस्थित लाभली. या स्पर्धेत अमळगाव केंद्रातील जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील अापले नैपुण्य व कौशल्ये याची चुणूक दाखवली. खेळाडू स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षक विद्यार्थ्यांचा चिअरअप कॉल व टाळ्यांचा आवाज यामुळे मैदानावरील वातावरण चैतन्यमय व उत्साहपूर्ण वाटत होते. 

क्रीडास्पर्धा निकाल

क्रीडा प्रकार:- लिंबू चमचा 
गट क्रमांक 1 ( इ.1 ली ते 2 री)
मुले
प्रथम:- दिपक राजेंद्र भिल (पिंगळवाडे)
द्वितीय:- निलेश जगदीश भोई (दोधवद)
तृतिय:- जितेंद्र गल्या पावरा (जळोद)
मुली
प्रथम:- खुशी किशोर माळी (गांधली)
द्वितीय:- राणी समाधान धनगर (दोधवद)
तृतिय:- भुमिका शरद पाटील (जळोद)

क्रीडा प्रकार:- धावणे
गट क्रमांक 1 (इ.1 ली ते 2 री)
मुले
प्रथम:- दिपक राजेंद्र भिल (पिंगळवाडे)
द्वितीय:- रोहित राजेंद्र भिल (मेहेरगाव)
तृतिय:- जितेंद्र गल्या पावरा (जळोद)
मुली
प्रथम:- स्वाती नवल तिरमले (पिंगळवाडे)
द्वितीय:- रुपाली अशोक पाटील (मेहेरगाव)
तृतिय:- भुमिका शरद पाटील (जळोद)
गट क्रमांक 2 (इ.3 री ते 4 थी)
मुले
प्रथम:- राहुल सुकलाल पावरा (जळोद)
द्वितीय:- रोहन राजेंद्र भिल (पिंगळवाडे)
तृतिय:- उज्वल दिपक शिरसाठ (कलाली)
मुली
प्रथम:- फुलवंती सुलतान बारेला (मेहेरगाव)
द्वितीय:- रिना संजय भिल (जळोद)
तृतिय:- दिव्या सतिष कुंभार (अमळगाव) 
गट क्रमांक 3 (इ.5 वी ते 8 वी)
मुले
प्रथम:- चंद्रशेखर शिवाजी कोळी (जळोद)
द्वितीय:- ओंकार दिपक मोरे (कलाली)
तृतिय:- कुंदन किरण सपकाळे (पिंगळवाडे)
मुली
प्रथम:- गायत्री नवल पाटील (पिंगळवाडे)
द्वितीय:- पुनम अनिल शेटे (जळोद)

क्रीडा प्रकार:- कबड्डी
गट क्रमांक 2 (इ.3 री ते 4 थी)
मुले
विजेता संघ:- जि.प.शाळा जळोद
उपविजेता संघ:- जि.प.शाळा पिंगळवाडे
मुली
विजेता संघ:- जि.प.शाळा जळोद
उपविजेता संघ:- जि.प.शाळा मेहेरगाव
गट क्रमांक 3 (इ.5 वी ते 8 वी)
मुले
विजेता संघ:- जि.प.शाळा निंभोरा
उपविजेता संघ:- जि.प.शाळा पिंगळवाडे
मुली
विजेता संघ:- जि.प.शाळा पिंगळवाडे
उपविजेता संघ:- जि.प.शाळा जळोद

क्रीडा प्रकार:- लंगडी
गट क्रमांक 2 (इ.3 री ते 4 थी)
मुले
विजेता संघ:- जि.प.शाळा पिंगळवाडे
उपविजेता संघ:- जि.प.शाळा जळोद
मुली
विजेता संघ:- जि.प.शाळा जळोद
उपविजेता संघ:- जि.प.शाळा गांधली
गट क्रमांक 3 (इ.5 वी ते 8 वी)
मुले
विजेता संघ:- जि.प.शाळा जळोद
उपविजेता संघ:- जि.प.शाळा पिंगळवाडे
मुली
विजेता संघ:- जि.प.शाळा पिंगळवाडे
उपविजेता संघ:- जि.प.शाळा जळोद

यासाठी क्रीडा गुणलेखक म्हणून रविंद्र पाटील वेळाधिकारी म्हणून प्रदीप महाजन व पंच म्हणून नितीन सोनवणे यांनी काम पाहिले.

क्रीडा स्पर्धेचे सुत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे व चंद्रकांत देसले यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख श्री.गोकुळ आनंदा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अमळगाव केंद्रातील क्रीडा शिक्षक रविंद्र पाटील, नितीन सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, चंद्रकांत देसले, सुनिल पाटील, प्रेमराज पवार, मनोहर पाटील, रविंद्र पाटील, प्रदीप महाजन, अरुण पाटील, सतिश पाटील, मगन चौधरी, गुलाब शिरसाठ, जयश्री पवार, महानंदा सूर्यवंशी, सुनंदा सोनगीरे व अमळगाव हायस्कूलचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

दत्तात्रय सोनवणे (9420111182)
जि.प.उच्च प्राथ.शाळा,पिंगळवाडे ता.अमळनेर

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.