Halloween party ideas 2015

थर्टीफर्स्ट च्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलीस प्रशासन सज्ज, नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करू नये , पोलिसांची तळीरामांवर करडी नजर  !  : डीवायएसपी काशिद , पोलीस निरीक्षक रामदास इंगवले

      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) थर्टीफर्स्ट अर्थात ३१ डिसेंबर म्हणजे वर्षाखेर हा दिवस संपूर्ण देश विदेशात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक ठिकाणे, पर्यटनस्थळे, पंचतारांकित हाॅटेल, समुद्र किनारे, ऐतिहासिक ठिकाणे आणि निळ्या नभांगणाखाली सर्वत्र सरत्या वर्षाला बाय बाय करून रात्री बारा वाजल्यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांच्या प्रचंड आतिषबाजीत नववर्षाचे जंगी स्वागत केले जाते. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई आणि अन्य शहरातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे लोंढे संपूर्ण कोकणात येतात त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खासगी वाहनांचा ओघ वाढतो आणि परिणामी वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो या सर्व बाबींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांना निर्भय आणि निकोप वातावरण निर्माण करून देण्यासाठी माणगांवचे कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी शशिकिरण काशिद साहेब यांच्या नेतृत्वाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे डॅशिंग आणि कर्तव्य कठोर पोलीस निरीक्षक रामदास इंगवले साहेब यांनी माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी सुसुत्रबध्द असे नियोजन केले आहे. 


      डीवायएसपी शशिकिरण काशिद  कोट :   मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर अर्थात थर्टीफर्स्ट च्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलीसांच्या माध्यमातून संपूर्ण माणगांव तालुक्यातील संवेदनशील ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत करावे. 

       माणगांव पोलीस निरीक्षक रामदास इंगवले कोट  :   ३१ डिसेंबर चालू वर्षाचा शेवटचा दिवस थर्टीफर्स्ट आणि नुतन वर्षाभिनंदन च्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलीस खात्याकडून माणगांव मध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नववर्ष साजरे करताना नागरिकांनी आणि पर्यटकांनी ड्रिंक अॅड ड्राइव करू नये. त्याच बरोबर कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करू नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीसांना सर्वोतोपरी सहकार्य करावे. 

      वर्षाखेर आणि नुतन वर्षाभिनंदनाच्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. असे दोन्ही पोलीस अधिकारी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.