Halloween party ideas 2015


मुडी,बोदर्डे,कळंबे या तिन गावांचा पोस्टमनचा भार एका सावित्रीच्या लेकीवर,पोस्टमनच्या रिक्त जागेवर पोस्टमनची नियुक्ती करा,स्थानिक रहिवाशी आंदोलनच्या पवित्र्यात..



अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासूनशासनाच्या नोकर कपातीच्या धोरणाचा फटका ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेला बसत आहे. असाच फटका अमळनेर तालुक्यातील मुडी, बोदर्डे, कळंबे या तिन्ही गावात पोस्टमास्तर
नसल्याने बसत आहे. त्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून या तिन्ही गावांसाठी एकटीच रनरागिणी आपल्या पायात भिंगरी बांधून टपाल वाटपाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. उन, वारा, पाऊस झेलत आपल्या कामाची 'शोभा' त्या वाढवत आहे.इंटरनेच्या जाळ्याने सर्व सहज आणि सोपे झाले
असले तरी काही सेवा घरपोच मिळण्याचे महत्त्व आजही अबाधित आहे. त्यात पोस्ट सेवा ही गणली जाते. ग्रामीण भागात या सेवा आजहीअविरत चालू ठेवण्याशिवया पर्याय नाही. कारण विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे असोत कृषी माहिती विषयक मासिके, पेन्शन धारकांचे रजिस्टर, पत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी सुविधा या पोस्टानेच मिळतात. त्यामुळे पोस्टमानचे महत्त्व आजही ग्रामीण भागात अबाधितच आहे. पण आजही अनेक ठिकाणी पोस्टमनची पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
    अमळनेर तालुक्यातील मुडी, बोदड़े ,कळंबे, यातिन्ही गावांत गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून पोष्टमनच नाही. यामुळे पंचक्रोशीतील नागरिक व विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना अत्यावश्यक सुविधा वेळेवर पोहोचत नाहीत.
त्यामुळे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे. अमळनेर मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये, शासनाकडे व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करून देखील पोस्टमन उपलब्ध होत नसल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या काही दिवसांत केंद्र शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.