Halloween party ideas 2015

शाळांची श्रीमंती संख्येवर नव्हे तर गुणवत्तेवर- अनिल बोरनारे

*मो.कृ.नाखवा शाळेचा स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक सोहळा संपन्न*

ठाणे (प्रतिनिधी) शाळांची श्रीमंती केवळ भरमसाठ विद्यार्थी संख्येवर नसून  विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांवर ठरत असल्याचे प्रतिपादन  महाराष्ट्र राज्य जवाहर बाल भवन मंडळाचे उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केले. 
ठाण्यातील मो.कृ.नाखवा माध्यमिक हायस्कुल व जिजाई बाल मंदिर प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेच्या स्नेह-संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला विद्यादान संस्थेच्या निवेदिता जोशी, शाळेचे मुख्याध्यापक संपत गीते, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका धनश्री मानिवडे, क्रीडा भारतीचे मुकुंद टांकसळे, सचिन खराडे, प्रमोद भोपी,  सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती इंदोरे, जगन्नाथ केदार, श्रुतिका मोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणापायी मराठी शाळांमधील विद्यार्थी कमी होत असली तरी मराठी माध्यमाच्या शाळांनी आपली गुणवत्ता टिकवली असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक उपक्रम शाळा राबवित आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले. यावेळी निवडक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. 
मो.कृ. नाखवा शाळेने ठाण्यामध्ये मागील ५० वर्षात अनेक विद्यार्थी घडविले असून शाळेची विद्यार्थी संख्या कमी झाली असली तरी शाळाबाह्य उपक्रमांमुळे गुणवत्तेत वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना अश्याच अभ्यासपूरक उपक्रमांची गरज असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

छंदाचे रूपांतर करिअर मध्ये करा

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अनेक छंद असतात. शाळेने विद्यार्थ्यांचे हे गुण हेरून त्यांना वाव दिला तर छंदाचे रूपांतर करिअर मध्ये होऊ शकते, अनेक मान्यवरांची विविध उदाहरणे देत  बोरनारे यांनी विद्यार्थ्यांना छंद जोपासण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मेखे तर आभार सौ गायकर यांनी मानले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.