आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मंगळग्रह महाराजाला साकळे
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपद मिळावे यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मंगळग्रह मंदिरात जाऊन आरती केली व मंगळग्रह महाराजांना साकडे घातले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व सर्व सन्माननीय पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
