Halloween party ideas 2015


बालकाच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची 
जि .प .

सदस्या जयश्री पाटील


पोदार जंबो किडस अमळनेर येथे मास्टरशेफ कार्यक्रम उत्साहात संपन्न

अमळनेर प्रतिनिधी

"मास्टर शेफ "...अमळनेर...पोदार जंबो किड्स अमळनेर येथे आज दिनांक 28/12/2019 रोजी  "मास्टरशेफ" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ. जयश्रीताई अनिल पाटील व माननीय सौ. रंजनाताई प्रवीण देशमुख या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश "कुटुंबातील एकोपा वाढविणे"होता.                                  "आजी आणि वडील यांनी मिळून मुलांसाठी खाऊ बनविणे व मुलांसोबत क्वालीटी टाइम देणे "असून  यात पालकांनी विविध प्रकारचे पोषक पदार्थ बनवीत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाविषयी बोलताना सौ जयश्री पाटील यांनी सांगितले की वडीलांचा सहभाग असलेला पाककलेचा कार्यक्रम मी आज पहिल्यांदाच "पोदार जंबो किड्स "मध्ये अनुभवला.  कार्यक्रमाची संकल्पना खूपच छान असून अजूनपर्यंत तरी मी असे कुठेच अनुभवले नाही. तसेच प्रत्येक गोष्टीत वडिलांचा सहभाग हाही तेवढाच गरजेचा असून मुलांच्या सर्वागीण विकासात तो खुपच महत्वाचा आहे, व तो या कार्यक्रमाच्या माध्यमातून  साध्य होताना दिसून येत आहे. असे उदगार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले . तसेच सोबत असलेल्या प्रमुख म्हणून सौ.रंजना प्रवीण देशमुख  यांनीही त्यांच्या मनोगतातून नमूद केले की आजच्या मुलांच्या सर्वांगीण विकासात आहार हा विषय अतिशय गांभिर्याचा असून त्याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असून ते होऊ नये म्हणून पोदार सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा  या गोष्टी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत जंबो किड्स च्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे... तसेच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना शाळेत आणून सोडणे व शाळा सुटल्यावर घरी घेऊन जाणं व घरी जाताना एखादी चॉकलेट घेऊन देणे एवढीच वडिलांची जबाबदारी नसून मुलांच्या भावनिक विकासासाठी पालकांनीही विशेषताः वडिलांनी  जास्तीत जास्त वेळ देत भावनिक विकास योग्य रित्या करीत एक सुजाण नागरिक घडविण्यात आपले योगदान द्यावे असे अप्रत्यक्ष रित्या दिसून येते असे प्रमुख पाहुण्यांनी विशेष नमूद केले...       तसेच कार्यक्रमात सर्व पालकांनी घरून विविध पौष्टिक पदार्थ बनवून आणून शालेय प्रांगणात त्याची सजावट करून  ते प्रमुख पाहुण्यांना प्रत्यक्ष चाखून पाहत त्याचा आस्वाद घेत आनंद घेतला .   पोदार जम्बो किड्सचे सेंटर हेड श्री . प्रशांत कुडे यांनी शाळेच्या इतर कार्यक्रमांची व पोदारच्या वैशिष्टयांची माहिती दिली, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योगा, खेळ गणित विषय शिकविण्यासाठी नंबर मॅजिक किट, इंग्लिश शिकविण्यासाठी सिम्फोनीक,  लॉजिकल स्किल डेव्हलपमेण्ट साठी "रोबोटिक्स आणि डीकोडिंग" या स्पेशल किटचा समावेश मुलांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे , या विषेश अभ्यासक्रमामूळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो अशी माहिती सरांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोदार जंबो किड्स अमळनेर च्या सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य लाभले  सर्वात शेवटी प्रमुख पाहुण्यांचे आभार पोदार जंबो किड्स च्या प्रमुख सौ नीलिमा प्रशांत कुडे यांनी मानले व अशा प्रकारेकार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.